मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक कर्णधार टीम पेनने यष्टीमागे चांगली कामगिरी केली आहे. त्याने यष्टीमागे पहिल्या डावात ३ झेल घेतले आहेत. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
पंतची विकेट आणि पेन-स्टार्कचे विक्रम
भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेमध्ये चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली होती. पण या दोघांमध्ये ५७ धावांची भागीदारी झालेली असतानाच मिशेल स्टार्कने डावातील ६० वे षटक टाकत पंतला बाद केले. पंतचा झेल यष्टीमागे उभ्या असणाऱ्या टीम पेनने घेतला. याबरोबरच पेनच्या यष्टीमागे १५० विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. त्याने यष्टीमागे १४३ झेल घेतले आहेत आणि ७ यष्टीचीत केले आहेत.
विशेष म्हणजे त्याने ३३ वा कसोटी सामना खेळताना यष्टीमागे १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने क्विंटॉन डी कॉकला मागे टाकले आहे. डी कॉकने ३४ कसोटी सामन्यात १५० विकेट्सचा टप्पा पार केला होता.
Sensational stuff @tdpaine36 👊 #AUSvIND pic.twitter.com/lvhErQM5Vq
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2020
स्टार्कचे २५० विकेट्स –
याबरोबरच स्टार्कने त्याच्या कारकिर्दीत २५० कसोटी विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. तो कसोटीत २५० विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा ९ वा गोलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी ५९ व्या कसोटी सामन्यात खेळताना केली आहे.
Test wicket No.250 for Starc + Test dismissal No.150 for Paine! @VodafoneAU | #AUSvIND pic.twitter.com/yptEW2hFyY
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2020
पंत २९ धावा करुन बाद झाला. याव्यतिरिकेत भारताकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली असून भारताने ८० पेक्षाही अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद १५० विकेट्स घेणारे क्रिकेटपटू –
३३ कसोटी – टीम पेन
३४ कसोटी – क्विंटॉन डी कॉक
३६ कसोटी – ऍडम गिलख्रिस्ट
३८ कसोटी – मार्क बाऊचर
३९ कसोटी – रॉड मार्श
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : नॅथन लायनच्या फिरकीत हनुमा विहारी आडकला, झाला ‘असा’ बाद
ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर जे कोणत्याही भारतीय फलंदाजाला नाही जमलं, ते एकट्या पंतने करून दाखवलं
“गिलने दोन वर्षांपुर्वीच कसोटीत पदार्पण करायला हवे होते”, पाहा कुणी केलंय हे वक्तव्य