वनडे क्रिकेटच्या इतिहासात ८ पुरुष तर २ महिला खेळाडूंनी द्विशतकी खेळी केली आहे. सचिन तेंडूलकर हा पुरुष क्रिकेटपटूंमधील पहिला खेळाडू होता ज्याने २०१०मध्ये वनडेत द्विशतकी खेळी केली होती. तर महिलांमध्ये बेलिंडा क्लार्कने १९९७मध्येच २२९ धावांची खेळी करत वनडेत शतक ठोकले होते.
रोहित शर्मा हा पुरुष किंवा महिला खेळाडूंमध्ये असा एकमेव खेळाडू आहे ज्याने वनडेत तीनवेळा द्विशतकी खेळी केली आहे. अन्य कुणालाही हा कारनामा दोन वेळाही करता आलेला नाही.
द्विशतक करणाऱ्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंमध्ये केवळ सचिन तेंडूलकर, ख्रिस गेल व अॅमेलिया केर या तीन खेळाडूंनी द्विशतकी खेळी करताना वनडे कारकिर्दीत डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
सचिनने 24 फेब्रुवारी 2010 ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध द्विशतक केले होते. तर 1 एप्रिल 1998ला आॅस्ट्रेलिया विरुद्ध आणि 2 एप्रिल 2005ला पाकिस्तान विरुद्ध त्याने 5 विकेट घेतल्या आहेत. तसेच सचिनने कोचीलाच पाकिस्तानविरुद्ध २ एप्रिल २००५ रोजी ५ विकेट्स घेतल्या होत्या.
ख्रिस गेलने 5 वर्षांनंतर 2015 ला झालेल्या विश्वचषकात 24 फेब्रुवारीलाच द्विशतक केले होते. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध 215 धावा केल्या होत्या. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1जून 2003 ला 5 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. गेलने डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा ३ वेळा केला आहे.
महिला खेळाडूंमध्ये अॅमेलिया आय़र्लंडविरुद्ध डब्लिन येथे द्विशतकी खेळी १३ जून २०१८ रोजी केली. तसेच याच सामन्यात तिने ५ विकेट्स देखील घेतल्या होत्या. एकाच सामन्यात द्विशतकी खेळी व ५ विकेट्स घेणारी ती जगातील पहिली व एकमेव खेळाडू आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू
-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात
-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू