लवकरच प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सुरू होणार आहे. या हंगामासाठी येत्या शुक्रवार आणि शनिवारी (०५ आणि ०६ ऑगस्ट) लिलाव होणार आहे.१२ संघ स्टार कबड्डीपटूंवर बोली लावण्यासाठी या लिलावात उतरतील. ५ आणि ६ ऑगस्ट, या २ दिवसांत ५०० पेक्षा अधिक कबड्डीपटूंवर बोली लावल्या जातील. तत्पूर्वी संघांनी रिटेंशन पॉलिसीचा पुरेपूर वापर करत आपल्या प्रमुख खेळाडूंना संघात कायम करतील. येथे आपण प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League 2022, पीकेएल) २०२२च्या लिलावाबद्दल (PKL 2022 Auction) काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया…
केव्हा होणार आहे पीकेएल २०२२ साठी खेळाडूंचा लिलाव?
पीकेएल २०२२ साठी खेळाडूंचा लिलाव ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
कुठे होणार आहे पीकेएल २०२२ साठी खेळाडूंचा लिलाव?
पीकेएल २०२२ साठी खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे.
किती वाजता होणार आहे पीकेएल २०२२ साठी खेळाडूंचा लिलाव?
पीकेएल २०२२ साठी खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.
यावेळी पीकेएलमध्ये किती खेळाडूंवर लागणार बोली?
पीकेएल २०२२च्या लिलावात ५०० पेक्षा जास्त कबड्डीपटूंवर संघ बोली लावतील.
पीकेएल २०२२ लिलावासाठी संघांच्या खिशात किती पैसे आहेत?
पीकेएल २०२२ च्या लिलावासाठी १२ संघांकडे ४.४ कोटी रुपयांचे बजेट आहे. या पैशातून संघ लिलावात खेळाडू विकत घेतील. तसेच रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची रक्कम यातून कापली जाईल.
पीकेएलची रिटेंशन पॉलिसी कशी आहे?
पीकेएल २०२२ लिलावासाठी ४ वेगवेगळ्या श्रेणी बनवण्यात आल्या आहेत. ज्या खेळाडूंना रिटेन केले जाणार नाही, त्यांना या श्रेणींमध्ये ठेवले जाईल. देशांतर्गत, परदेशी आणि नवखे युवा खेळाडू यांचा यात समावेश असेल. त्यानंतर या खेळाडूंना अष्टपैलू, रेडर्स आणि डिफेंडर्स असे विभागले जाईल. यासाठी ४ उप-श्रेणी करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये अ, ब, क आणि ड उप-श्रेणींचा समावेश आहे.
यावेळी एलिट रिटेन्ड प्लेअर्स कॅटेगरी अंतर्गत फ्रँचायझीला जास्तीत जास्त ६ खेळाडू संघात कायम ठेवण्याची परवानगी आहे. प्रत्येक पीकेएल हंगामात निर्धारित अटींअंतर्गत ४ नव्या युवा खेळाडूंना संघात रिटेन केले जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया कपचे आयोजनस्थळ बदलूनही श्रीलंका क्रिकेट बोर्ड कमावणार रग्गड पैसा
फॅनने पुन्हा पुन्हा I Love You म्हटल्याने लाजून लाल झाला रिषभ पंत, रिऍक्शनचा व्हिडिओ व्हायरल
कर्णधार रोहितने घेतली ‘प्रतिज्ञा’, जग जिंकण्याआधी आशिया चषकावर कोरायचे आहे भारताचे नाव