हैदराबाद। गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या चेन्नई सुपरस्टार्ज संघांविरुद्ध पुणे सेव्हन एसेस संघाने 5-2 असा विजय मिळवत चमक दाखवली.त्यामुळे स्टार स्पोर्ट्स प्रिमियर बॅडमिंटन लीगमध्ये दुसऱ्या डबल हेडरमध्ये त्यांचा सामना शनिवारी नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाशी होणार आहे. तर, चेन्नई सुपरस्टार्ज
संघाचा प्रयत्न अवाधे वॉरियर्सविरुद्ध चांगल्या कामगिरीचा असणार आहे.
पुण्याच्या संघाने आतापर्यंत दबावाखाली चांगली कामगिरी केली आहे. आता पर्यंत चिराग शेट्टी आणि हेंद्र सेतीआवान ही जोडी अपराजित राहिली आहे. या जोडीने नुकतेच सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि सुमित रेड्डी जोडीला पराभूत केले.पुणे सेव्हन एसेस संघातून खेळताना मला आनंद होत आहे. आमचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि अगामी सामन्यात देखील हा विजयी फॉर्म आम्ही कायम ठेऊ असे सेतीआवान म्हणाला.2019 थायलंड मास्टर्स चॅम्पियन लोह किएन येवने देखील संघासाठी चमक दाखवली आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता ख्रिस व गॅब्रिएल एडकॉक यांच्या खेळामुळे पुणे संघाला आपली छाप पाडता आली आहे.
नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाने आतापर्यंत झालेल्या चार सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या मिशेल ली सलग विजय नोंदवत आपली छाप पाडली. त्यामधील एक विजय हैदराबाद लेग मध्येच जागतिक चॅम्पियन सिंधू विरुद्ध होता.अनुभवी ली योग डाए व किम हा ना जोडीने मुंबई रॉकेट्स संघाविरुद्ध चमक दाखवली त्यामुळे एडकॉक जोडीविरुध्द ते कसे खेळतात हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
चेन्नई सुपरस्टार्ज संघाचा प्रयत्न पुन्हा एकदा विजय मिळवण्याचा असेल. संघाला सात्विककडून अपेक्षा आहेत. थायलंड ओपन विजेत्या या खेळाडूला पहिल्या दुहेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले त्यामुळे तो विजयासाठी उत्सुक असेल.युवा खेळाडू लक्ष्य सेन व गिलमौर देखील संघासाठी महत्त्वाचे आहेत.
बिवेन झांगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अवाधे वॉरियर्स संघाने लखनऊ येथील अंतिम सामन्यात मुंबई रॉकेट्स संघाविरुद्ध 5-0 असा विजय मिळवला. वोग विंग की व्हिन्सेंट याने देखील दोन्ही सामन्यात चमक दाखवली. तर शुभंकर डे आणि अजय जयराम यांनी देखील विजय मिळवला. घरच्या शेवटच्या लढतीत विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. अगामी सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे डे म्हणाला. अवाधे संघात जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानी असलेल्या को सुंग ह्युन आणि शिन बिक चोएल यांनी देखील चमक दाखवली आहे.