पुणे । अनिरुद्ध देशपांडे याने सात गुणांसह विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ११व्या खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा बुद्धीबळ संघटनेची मान्यता असलेली ही स्पर्धा भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळ येथे झाली. स्पर्धेच्या उद्घाटनास नगरसेवक आनंद रिठे, राष्ट्रीय टेबल टेनिसपटू पृथा वर्टीकर उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभास एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, अनिल छाजेड, सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडीया, मंडळाचे अध्यक्ष सुनील पांडे, अभिजीत मोडक, भूषण मोरे, प्रसाद शिवदे, अभिजीत गाडवे उपस्थित होते.
२१६१ रेटिंग असलेल्या फिडे मास्टर अनिरुद्ध देशपांडेने सातव्या आणि अखेरच्या फेरीत इंटरनॅशनल मास्टर समीर काठमळे (२३२८ रेटिंग) याला पराभूत केले. अनिरुद्ध अखेरपर्यंत अपराजित राहिला. त्या आधी अनिरुद्धने सहाव्या फेरीत किरण पंडितराव, पाचव्या फेरीत राहुल वर्मा, चौथ्या फेरीत सिद्धान्त ताम्हणकर,तिस-या फेरीत आशिष गुप्ता, दुस-या फेरीत प्रशांत पिसे आणि पहिल्या फेरीत अनुज दांडेकरला पराभूत केले.
किरण पंडितराव, रणवीर मोहिते, निखिल दीक्षित, सिद्धान्त ताम्हणकर यांनी प्रत्येकी सहा गुणांसह अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला. स्वीस लीग फॉरमॅटमध्ये एकूण सात फे-यांमध्ये ही रॅपीड प्रकारातील स्पर्धा होती. यात एकूण १५५ खेळाडू सहभागी झाले होते.
प्रत्येक गटातील १ ते १० क्रमांकांना रोख पारितोषिक देण्यात आले. यात ८, १०, १२, १४, वर्षांखालील, तसेच महिला व ज्येष्ठ नागरीक अशा सर्वांना मिळून एकूण ३० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
निकाल –
सातव्या फेरीचे काही निकाल – समीर काठमळे (५.५) पराभूत वि. अनिरुद्ध देशपांडे (७), रणवीर मोहिते (६) बरोबरी वि. निखिल दीक्षित (६), किरण पंडितराव (६) वि. वि. दिपांकर कांबळे (५), श्रेयस हापसे (५.५) बरोबरी वि. गौरव दास (५.५), अर्णव नानल (५.५) बरोबरी वि. रोहन जोशी (५.५), सिद्धान्त ताम्हणकर (६) वि. वि. प्रणव वाडेकर (५), मिहीर सरवदे ५.५) वि. वि. कपिल लोहाना (४.५), पुष्कराज बेडेकर (५.५) वि. वि. आर्यन सिंगला (४.५), हिमांशू छाब्रा (५) बरोबरी वि. ऋषभ गोखले (५), संजीव मिश्रा (४.५) पराभूत वि. शिवराज पिंगळे.
खुला गट –
अनिरुद्ध देशपांडे (७ गुण), किरण पंडितराव (६), रणवीर मोहिते (६), निखिल दीक्षित (६), सिद्धान्त ताम्हणकर (६), समीर काठमळे (५.५), पुष्कराज बेडेकर (५.५), गौरव दास (५.५), मिहीर सरवदे (५.५), श्रेयस हापसे (५.५).
एलो रेटिंग १००० ते १२०० – अर्णव नानल, प्रणव वाडेकर, अनूज दांडेकर, इशन वारुडकर, रुपेश हागिरे.
एलो रेटिंग १२०१ ते १४०० – शिवराज पिंगळे, भूपेश गोसावी, अभिजय दंडवते, प्रज्वल आव्हाड, अमित धुमाळ.
सर्वोत्कृष्ट प्रौढ खेळाडू- लक्ष्मण खुडे, प्रकाश करमरकर.
सर्वोत्कृष्ट महिला- धनश्री खैरमोडे, संजना जोईल.
८ वर्षांखालील मुले – आरुष डोळस, जतीन सराफ, अविरत चौहान. मुली – इरा बोहरा, आयुषा सिंग.
१० वर्षांखालील मुले – युग सोनिगारा, विराज सराफ, वेद मुळ््ये. मुली – कमल गोरे, निहीरा कौल, सानवी चातुरकर.
१२ वर्षांखालील मुले – आर्यन सिंगला, मोर धीरेन, सुयोग वाडके. मुली – अदिती कायल.
१४ वर्षांखालील मुले – शार्दूल गोडबोले, नील काकडे, वरद साळुंखे. मुली – सेजल ठाणेकर, मानसी टिळेकर, तन्वी कुलकर्णी.