आर्या, श्रावणी, सानिका, रुमानी उपांत्यपूर्व फेरीत

पुणे । आर्या कुलकर्णी, श्रावणी अर्डे, सानिका देशपांडे, रिद्धीमा जोशी, रुमानी देवधर यांनी महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने आयोजित हौशी खेळाडूंच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमीच्या सहकायार्ने व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे. या स्पधेर्तील ११ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुस-या फेरीत आर्या कुलकणीर्ने माही परदेशीवर १५-३, १५-७ असा, श्रावणी अडेर्ने संविधा लांडेवर १०-१५, १५-११, १५-१० असा विजय मिळवला.

यानंतर ख्याती कत्रेने सई जोशीला १५-८, १५-१२ असे, सानिका देशपांडेने लतिका पुजारीला १५-४, १५-२ असे नमविले. रिद्धीमा जोशीने मुक्तजा वाघळेचा १५-१७, १७-१५, १५-९ असा, तर आलिया सोनीने इशिता मंत्रीचा १५-४, १५-१० असा पराभव केला. रुमानी देवधरने आर्या खुतळेवर १५-७, १५-११ अशी, तर सोयरा शेलारने शुभ्रा वैंशपायनवर १५-१२, १५-११ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स्पधेर्तील ११ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या तिस-या फेरीत नील जोशीने जय कुलकर्णीवर १५-०, १५-२ असा, तर रोहन सायनकरने नचिकेत गोखलेवर १२-१५, १५-१३, १५-१२,आणि समीहन देशपांडेने सयाजी शेलार वर १५-१३,१५-१३ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

निकाल –

तिसरी फेरी –

१७ वर्षांखालील मुली –

सिमरन धिंग्रा वि. वि. साक्षी दसवेकर १५-६, १५-११, मिली निबजिया वि. वि. उर्वी पाटील १५-८, १५-१०, शांभवी तेवारी वि. वि. कृतिका घोरपडे १५-८, १५-९, आर्या मुळीक वि. वि. गायत्री केंजळे १५-१३, १०-१५, १५-९, शेर्वा बेद्रे वि. वि. सायली पांडव १५-५, १५-६, वैष्णवी पिसे वि. वि. भूमी वैंशपायन १८-१६, १५-८, सान्वी राणे वि. वि. जान्हवी कुलकर्णी १५-९, १५-१२. १७ वर्षांखालील

मुले –

अथर्व अलवानी वि. वि. नीव मित्तल १५-७, १५-११, पार्थ कोरेगावकर वि. वि. विशेष जिवनानी १५-८, १५-७, आकाश कपाडिया वि. वि. अथर्व मोरे १५-१०, १५-३, अर्णव निकम वि. वि. नीरज वझे १५-११, १५-१०, तेज बेलखोडे वि. वि. नमन सुधीर १५-८, १८-१६, पीयूष दारजी वि. वि. आदित्य जोगळेकर १५-१३, १५-८, ऋचीर प्रभुणे वि. वि. श्रावण राठी १५-४, १५-३, नयन दारजी वि. वि. सोहम पोद्दार १५-७, १५-१०.

You might also like