पुणे | फुलांनी सजविलेला ट्रक…पारंपरिक वाद्यांचा गजर…सेल्फीसाठी आणि खेळाडूंशी शेकहँड करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची चाललेली धावपळ…अशा उत्साहमय वातावरणात पुणेकरांनी एशियन गेम्स २०१८ मध्ये रोईंग स्पर्धेतील सुवर्णपदक आणि कांस्यपदक विजेत्या रोव्हर्सचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळ सोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्याचा आॅटोग्राफ घेण्यासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होतीे. भारताच्या संघातील सुवर्णपदक विजेत्या स्वर्ण सिंग,दत्तू भोकनळ, ओम प्रकाश, सुखमीत सिंह तसेच कांस्यपदक विजेते रोहीत कुमार, भगवान सिंह, दुष्यंत आणि त्यांचे प्रशिक्षक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. चौकाचौकात पुणेकरांनी खेळाडूंचे स्वागत करीत भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.
- सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली…!!!
- अॅलिस्टर कूकने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा
महाराष्ट्र रोईंग असोसिएशन,महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालय आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने, जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या खेळाडूंच्या सन्मानार्थ ढोल -ताशांच्या गजरात जंगली महाराज रस्त्यापासून रॅली काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे चंद्रकांत शिरोळे, किर्लोस्करचे राजेंद्र देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान,अनिल चोरमुले, महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या सचिव मृदुला कुलकर्णी, सहसचिव संजय वळवी, खजिनदार क्रिष्णानंद हेबळेकर, नरेंद्र कोठारी, स्मिता यादव, मुजीद रहेमान,श्रीकांत हरनाळे, चनबस स्वामी यावेळी उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता जंगली महाराज मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जंगली महाराज मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय, ज्ञानेश्वर पादुका चौक, आणि शिवाजीनगर असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीनंतर कॉलेज आॅफ इंजिनिअरींगच्या सभागृहात रोव्हर्सचा सत्कार करण्यात आला.
दत्तू भोकनळ म्हणाला,१ वर्षापासून स्पर्धेसाठी सराव सुरु होता. डबल इव्हेंट करत असल्यामुळे सराव खूप वेगळा आणि यावर्षीचा सराव जास्त कठीण होता. आधी २० किलोमीटर सराव करायचो, परंतु स्पर्धेसाठी ४० किलोमीटर सराव केला. वैयक्तिक पदक मिळविण्यात अपयशी ठरलो परंतु सांघिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याचा आनंद आहे. आता २०२० चे आॅलिम्पिक हेच लक्ष्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही
–राशिद खान खेळणार या मोठ्या क्रिकेट लीगमध्ये