मुंबई । आयपीएल 2020 यूएईमध्ये आयोजित केले जाणार आहे. सर्वच फ्रेंचायझीं संघांनी आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, इंग्लंड वनडे संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनने आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की इंग्लंडचे खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देणे ही एक योजना होती, ज्यामुळे त्यांना विश्वचषक जिंकण्यासाठीही मदत झाली. इंग्लंडने २०१९ चा विश्वचषक मॉर्गनच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे.
मॉर्गन हर्षा भोगले यांच्याशी ‘क्रिकबझ इन कॉन्फरन्सेशन’ वर बोलतांना म्हणाला की, “आयपीएलमध्ये खेळणे स्ट्रॉसच्या योजनेचा एक भाग होता. मी त्यांना हा निर्णय घेण्यास उद्युक्त केले. आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत, चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वचषकातील दबाव झेलणे आव्हान असते. ”
तो म्हणाला, “त्यांनी मला विचारले की यात काय वेगळे आहे. एक, जर आपण परदेशी खेळाडू म्हणून खेळत असाल तर आपल्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. जर तुम्ही आयपीएलमध्ये खेळत असाल तर वेगळा दबाव आणि वेगळ्या अपेक्षाही असतात. कधीकधी आपण हे टाळू शकत नाही आणि त्यास सामोरे जाण्यासाठी आपल्याला एखादा मार्ग शोधावा लागतो.आयपीएलमुळे खेळाडूंना प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत दमदार कामगिरी करू शकले.”
आयपीएलमध्ये इंग्लंडचे मॉर्गन व्यतिरिक्त, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो असे अनेक खेळाडू खेळतात.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय माजी क्रिकेटपटू झाला कोच, थेट कॅरेबियन लीगमध्ये करणार मार्गदर्शन
फेक फॉलोवर्स रॅकेट: ‘या’ प्रसिद्ध क्रिकेट समालोचकाची होणार चौकशी, मुंबई पोलिसांंनी पाठविले समन्स
फ्लॉप झालेल्या भारतीय क्रिकेटरने घेतली होती पाकिस्तानी क्रिकेटरची मदत, पुढे असे काही केले…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ७- हेडनची पर्थच्या मैदानावर कसोटीतील वनडे स्टाईल फटकेबाजी
आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर