वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सहावा सामना सोमवारी (9 ऑक्टोबर) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड संघ आमने-सामने आले. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यात दम दाखवत शानदार खेळ्या केल्या. यादरम्यान युवा अष्टपैलू रचिन रवींद्र याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले.
यावेळी विजेतेपदाचे प्रमुख दावेदार म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या तीन षटकात एकही धाव केली नाही. मात्र, त्यानंतर त्यांनी आक्रमण केले. डेवॉन कॉनवे व विल यंग यांनी 12.5 षटकात 67 धावा केल्या. कॉनवे 32 धावा करून माघारी परतल्यानंतर रचिन याने मैदानात प्रवेश केला.
त्याने अगदी सुरुवातीपासूनच नेदरलँडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. फिरकी गोलंदाजांना पुढे सरसावत त्याने षटकार खेचले. दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी रचना त्याने आपले महत्त्वाचे योगदान दिले. मर्व याच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 51 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. यामध्ये तीन चौकार व एका षटकारांचा समावेश होता. या विश्वचषकातील ही त्याची सलग दुसऱ्या सामन्यातील 50 पेक्षा जास्त धावांची खेळी ठरली.
भारतीय वंशाचा असलेल्या रचिन याने आपल्या विश्वचषक पदार्पणात धमाकेदार कामगिरी केलेली. इंग्लंडविरुद्ध त्याने 96 चेंडूवर 123 धावांची खेळी केली होती. यामध्ये अकरा चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलेले. रचिन याचे वडील बेंगलोर येथील रहिवासी असून ते मागील अनेक वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच त्याचे नाव देखील सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड या भारतीय खेळाडूंच्या नावावरून ठेवले गेले आहे.
(Rachin Ravindra Showing His Top Form In 2023 ODI World Cup Fifty Against Netherlands)
महत्वाच्या बातम्या –
आले किती गेले किती, पण वनडेतील ‘चेज मास्टर’ विराटच; सरासरी पाहून तोंडात घालाल बोटे
जिथं सचिन, तिथं विराट! वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ‘एवढ्या’ वेळा ठोकल्या 50 हून अधिक धावा