अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएलचा २१वा सामना खेळवला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्ज हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताने पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
मात्र पंजाबची पहिल्या डावातील कामगिरी यथातथाच राहिली. त्यांच्या फलंदाजी कोलकताच्या शिस्तबद्ध गोलंदाजी समोर ढेपाळली. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात २० षटकांत ९ बाद १२३ धावाच करता आल्या. या डावात कोलकताच्या राहुल त्रिपाठीने घेतलेल्या एका झेलाची जोरदार चर्चा झाली.
लाजवाब झेल घेत मयंकला धाडले तंबूत
पंजाबच्या डावाची सुरुवात काहीशी अडखळतच झाली होती. ३६ धावांच्या सलामीनंतर त्यांनी ६ धावांच्या अंतराने ३ विकेट्स गमावल्या. बाद होणार्या फलंदाजांमध्ये कर्णधार केएल राहुल, ख्रिस गेल आणि दीपक हुड्डाचा समावेश होता. ३ बाद ४२ अशा अवस्थेनंतर मयंक अगरवालने निकोलस पूरनच्या साथीने डाव सांभाळायला सुरुवात केली. त्यावेळी मयंक सेट होऊन मोठी खेळी साकारणार असे वाटत होते.
मात्र या मनसुब्यांवर पाणी फेरल्या गेले. १२व्या षटकाच्या दुसर्या चेंडूवर सुनील नरीनने त्याला बाद केले. मात्र या विकेट मध्ये नरीन इतकाच महत्वाचा वाटा राहुल त्रिपाठीचा देखील होता. मयंकने मारलेला चेंडू राहुलने मिडविकेटला चक्क कोलांटी उडी मारत पकडला. त्यामुळे मयंकची खेळी ३१ धावांवर संपुष्टात आली.
https://twitter.com/SRKxCombatant/status/1386700228162580482
कोलकाताने आव्हान पार करत मिळवला विजय
दरम्यान, पंजाबने दिलेले १२४ धावांचे लक्ष्य गाठत कोलकाताने या सामन्यात विजय मिळवला. कोलकाताच्या संघाची सुरुवात देखील अडखळतच झाली होती. मात्र त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ईओन मॉर्गन यांनी जबाबदारीने खेळ करत संघाला विजयी लक्ष्याचा जवळ पोहोचवले. राहुल त्रिपाठी ४१ धावांवर बाद झाला. मात्र मॉर्गनने दिनेश कार्तिकसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
महत्वाच्या बातम्या:
लाजवाब! रवी बिश्नोईने डोळे दिपवून टाकणारा झेल घेत सुनील नारायणला धाडले शुन्यावर माघारी, पाहा व्हिडिओ
कोरोना काळातही आयपीएल आयोजन पाहून अभिनव बिंद्रा संतापला, म्हणाला खेळाडू आणि अधिकारी आंधळे
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये बाबर आझमचा मोठा विश्वविक्रम; विराट कोहलीला मागे टाकत या यादीत अव्वल