इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३९वा सामना मंगळवारी (२६ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थान संघाने २९ धावांनी विजय मिळवला. हा राजस्थानचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयात गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही मोलाचे योगदान दिले. रियान परागला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला येत राजस्थानने (Rajasthan Royals) ८ विकेट्स गमावत १४४ धावांचा डोंगर उभा केला होता. राजस्थानच्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला १९.३ षटकात सर्वबाद ११५ धावाच करता आल्या.
Match 39. Rajasthan Royals Won by 29 Run(s) https://t.co/LIICyVCDBt #RCBvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2022
यावेळी बेंगलोरकडून फलंदाजी करताना कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) सर्वाधिक धावा केल्या. त्याने २१ चेंडूत २३ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त वनिंदू हसरंगाने १८, शाहबाज अहमदने १७, आणि रजत पाटीदारने १६ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल तर शून्य धावेवर तंबूत परतला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना आर अश्विन आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णाला २ विकेट्स घेण्यात यश आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून युवा फलंदाज रियान परागने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३१ चेंडूत ५६ धावा चोपल्या. यामध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) २७ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. रविचंद्रन अश्विन १७ आणि डॅरिल मिशेल १६ धावा करून बाद झाला. मागच्या सामन्यात शतक झळकावणारा जोस बटलर या सामन्यात ८ धावांवरच तंबूत परतला.
यावेळी गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, जोश हेजलवूड आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी २ विकेट्स खिशात घातले. तसेच, हर्षल पटेलने १ विकेट घेतली.
यासह राजस्थानने हंगामातील सहावा विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे बेंगलोर संघ पाचव्या स्थानीच कायम राहिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RCB vs RR। विराट कोहलीविषयी मोठी अपडेट, आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचा बदल
आता धीराने नाही, तर जोमाणे करावे लागेल काम; चेन्नईच्या फलंदाजांकडून चाहत्यांना आक्रमक खेळीची अपेक्षा
हार पत्करायला तयार नाही गुजरात टायटन्स; शमीने उचलला सर्वाधिक विकेट घेण्याचा विडा