अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने ससेक्स शार्क्स सोबतचा करार २०१९च्या टी-२० ब्लास्टमध्ये खेळण्यासाठी वाढवला आहे.
पुढील वर्षात होणारी कॅरेबियन प्रीमियर लीग सुरु होईपर्यंत तो काऊंटी क्रिकेट खेळणे अपेक्षित आहे पण यासाठी आंतरराष्ट्रीय मंजुरी आवश्यक आहे.
राशिदने पहिल्या अर्ध्या हंगामात खेळण्यासाठी ससेक्सबरोबर करार केला होता. यावेळी त्याने ससेक्ससाठी ११ टी-२० सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याची सरासरी १४.३५ आणि इकोनॉमी रेट ६.५९ होता.
काऊंटी क्रिकेटमध्ये राशिदने उपांत्यपूर्व सामन्यापर्यंत ससेक्स संघात खेळला आहे. मात्र सध्या राष्ट्रीय संघाकडून खेळत असल्याने नंतरच्या महत्त्वाच्या चार सामन्यांसाठी तो ससेक्ससाठी उपलब्ध नाही. १५ सप्टेंबरला ससेक्सचा सामना सोमरसेट विरुद्ध आहे.
‘मला या ससेक्स संघाकडून खेळण्यास खूप चांगले वाटत आहे. २०१९च्या टी-२० ब्लास्टमध्ये संघात परत आल्याने आनंद झाला आहे’, असे राशिद म्हणाला.
‘संघाला उपांत्यपूर्व सामन्यास पात्र ठरले बघून छान वाटले. त्यांना मी पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतो. यावेळी त्यांनी चांगली कामगिरी करावी आणि विजेतेपद जिंकावे’, असेही तो पुढे म्हणाला.
राशिदने १२५ टी-२० सामन्यात १५.२४च्या सरासरीने १९० विकेट्स मिळवले आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना ३१ सामन्यात २१.४७च्या सरासरीने ३८ विकेट्स घेतले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–१० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंड- विंडीजमध्ये होतेय अशी मालिका
–इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट तिसरा भारतीय
–मलिंगाचे एशिया कपसाठी श्रीलंका संघात कमबॅक