अहमदाबाद। सोमवारी (२६ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २१ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाबचा क्रिकेटपटू रवी बिश्नोईने अफलातून झेल घेतला. त्याच्या या झेलाचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत कोलकाताला १२४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी पहिल्या २ षटकातच नितीश राणा(०) आणि शुबमन गिल(९) या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. एवढेच नाही तर तिसऱ्या षटकात रवी बिश्नोईने घेतलेल्या अफलातून झेलामुळे सुनील नारायणलाही शुन्यावर बाद होऊन माघारी परतावे लागले.
https://twitter.com/anuragb0rah/status/1386716938252873729
झाले असे की पंजाबकडून तिसरे षटक अर्शदीप सिंग टाकत होता. त्याने टाकलेल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर नारायणने मोठा फटका खेळला. पण डीप मिड-विकेटच्या दिशेने पळत येत बिश्नोईने दोन्ही हात पुढे ठेवत चेंडूकडे नजर ठेवत पूर्ण शरीर झोकून देत झेल घेतला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या झेलामुळे कोलकाताला तिसरा धक्का केवळ १७ धावांवर बसला. पण त्यानंतर कोलकाताचा डाव राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ओएन मॉर्गनने अर्धशतकी भागीदारी करत सावरला.
https://twitter.com/AsmiThakkar/status/1386719853550071808
कोलकाताच्या गोलंदाजांची कमाल
या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत पंजाबला २० षटकात ९ बाद १२३ धावांवर रोखले. पंजाबकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर ख्रिस जॉर्डनने ३० धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, अन्य कोणाला फार खास काही करता आले नाही.
कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्स आणि सुनील नारायणने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना काळातही आयपीएल आयोजन पाहून अभिनव बिंद्रा संतापला, म्हणाला “खेळाडू आणि अधिकारी आंधळे…”
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये बाबर आझमचा मोठा विश्वविक्रम; विराट कोहलीला मागे टाकत ‘या’ यादीत अव्वल
आता राष्ट्रकुल स्पर्धेत रंगणार भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, ‘या’ ७ संघांनी मिळवली पात्रता