रायपूर। ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज २०२१’ स्पर्धा मागील काही दिवसांपासून शहिद वीर नारायण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगली. या स्पर्धेचा अंतिम सामना इंडिया लिजेंड्स विरुद्ध श्रीलंका लिजेंड्स संघात होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंडिया लिजेंड्स संघाकडून युवराज सिंग आणि युसुफ पठाणने आक्रमक फलंदाजी करताना अर्धशतके केली आहेत. त्यांच्या खेळीदरम्यानचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
इंडिया लिजेंड्सची खराब सुरुवात
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंडिया लिजेंड्सला पहिला धक्का विरेंद्र सेहवागच्या रुपात तिसऱ्याच षटकात बसला. सेहवाग १० धावांवर बाद झाला. त्यानंतर ५ व्या षटकात एस बद्रिनाथ ७ धावा करुन बाद झाला. मात्र यानंतर सचिन तेंडुलकरला साथ देण्यासाठी युवराज सिंग आला. या दोघांनी संघाचा डाव सावरला. पण या दोघांची भागीदारी रंगत असतानाच सचिन ३० धावांवर बाद झाला.
पण असे असले तरी यानंतर मात्र युवराज आणि युसुफची जोडी जमली. त्यांनी अर्धशतके करत इंडिया लिजेंड्सला २० षटकात ४ बाद १८१ धावांपर्यंत पोहचवले.
युवराज-युसुफची भागीदारी
युवराज आणि युसुफने कोणताही दबाव न घेता तुफानी फलंदाजी केली. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी झाली. या दोघांनीही या भागीदारीदरम्यान काही आक्रमक फटके खेळले. तसेच त्यांनी वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. युवराजने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६० धावांची खेळी केली. तर युसुफने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली.
या दोघांच्या खेळीबद्दल खूश होऊन चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी काही मीम्स देखील शेअर केल्या आहेत.
#INDLvSLL
Yusuf Pathan and Yuvraj Singh storm pic.twitter.com/4Xs3TNjOJJ— Shivani (@meme_ki_diwani) March 21, 2021
Fifty for Yusuf Pathan – 50* from just 24 balls including 3 fours and 5 sixes – the six-hitting machine on both sides. Yuvraj and Yusuf have added unbeaten 80 runs from just 39 balls so far. Game-changing partnership in the final. pic.twitter.com/uyRjFNvlEY
— Johns. (@CricCrazyJohns) March 21, 2021
https://twitter.com/AnejaDevang/status/1373653466925662211
YUVRAJ YUSUF SHOW
Unbelievable.#RoadSafetyWorldSeriesfinal— Waleed Zafar. (@realwaleedzafar) March 21, 2021
Yesterday's power hitters Rohit-Kohli.
Today's and yesteryear's power hitters Yuvi-Yusuf
What a show already! Tune in nowwww!#IndiaLegendsvssrilankalegends#INDLvSLL#Yuvraj
— Sumeet Sharma (@sharmasumeet) March 21, 2021
https://twitter.com/Vikashverma55/status/1373658573922705412
युवराज आणि युसुफच्या या खेळीमुळे इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सला विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG: पाचव्या टी२० सामन्यात टी नटराजनला का मिळाली केएल राहुल ऐवजी संधी, विराट कोहलीने केला खुलासा
आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे पुण्यात झाले आगमन, पाहा व्हिडिओ