भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नव्या वर्षाची सुरुवात जोरदार केली. 2023 मधील पहिला सामना रोहितने श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी (10 जानेवारी) खेळला. रोहित या सामन्यात नेहमीप्रमाणे भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला. शुबमन गिल याच्यासह सलामीला आल्यानंतर रोहितने अर्धशतकीय खेळी साकारली. नवीन वर्षातील ही आपली पहिली खेळी त्याने आपल्या मृत झालेल्या पाळीव श्वानास अर्पण केली.
बांगलादेश दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाल्याने रोहित अखेरच्या वनडे ला व त्यानंतर दोन कसोटींना मुकला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याने विश्रांती घेतली होती. त्यानंतर या वनडे मालिकेतून त्याने पुनरागमन केले.
गुवाहाटीच्या मैदानावर फलंदाजीला आलेल्या रोहितने पहिल्या षटकापासून आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने श्रीलंकन गोलंदाजांना अजिबात स्थिर न होऊ देता फलंदाजी सुरू केली. यादरम्यान त्याने 40 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर रोहितने नेहमीप्रमाणे सेलिब्रेशन न करता आकाशाकडे पाहिले. त्यानंतरच त्याने चाहत्यांचे अभिवादन स्वीकार केले. रोहितसाठी हे अर्धशतक काहीसे भावनिक होते. कारण, 9 जानेवारी रोजी त्याच्या पाळीव श्वानाचा मृत्यू झाला होता. रोहित हे अर्धशतक त्याला अर्पण केले.
रोहितने या सामन्यात गिलसह 19.4 षटकात 143 धावांची भागीदारी केली. रोहितने 67 चेंडूंमध्ये 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 83 धावांची वेगवान खेळी केली. गिल ने 70 धावांचे योगदान दिले. तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने आपल्या वनडे कारकीर्दीतील 45 वे शतक पूर्ण केले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात 373 धावा उभारलेल्या.
(Rohit Sharma Dedicated His Fifty To Died Pet)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत कोहलीच विराट! श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढत ठोकले 45 वे वनडे शतक
गिलने टीकाकरांना केले शांत! चौकारांचा पाऊस पाडत ‘या’ यादीत श्रेयस, विराटला टाकले मागे