fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जेव्हा हिटमॅन रोहित शर्मा उडवतो युजवेंद्र चहलची खिल्ली…

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हे दोघे चांगले मित्र आहेत. तसेच ते सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांची खिल्ली उडवतानाही दिसून येतात.

नुकतेच चहलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टवरही रोहितने कमेंट करताना चहलला ट्रोल केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने रविवारी(21 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात 1 धावेने निसटता विजय मिळवला होता. या सामन्यानंतर चहलने विराट कोहलीसह जल्लोष करतानाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या पोस्टला चहलने प्रेरणादायी कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘विजय हा नेहमीच युद्ध जिंकणे असे नसून जेव्हाही तूम्ही पडल्यानंतर पुन्हा उठता तो आहे.’

चहलच्या या पोस्टवर रोहितने कमेंट केली आहे की ‘पता ही नही था भाई'(मला माहितच नव्हते हे भाऊ). तसेच रोहितच्या या पोस्टवर कुलदिप यादवने ही कमेंट करताना हसण्याचे इमोजी टाकले आहेत.

याआधीही चहल आणि रोहित यांनी एकमेकांना असे सोशल मीडियावर बऱ्याचदा ट्रोल केले आहे.

Screengrab: Instagram/yuzi_chahal23

महत्त्वाच्या बातम्या – 

समालोचकांच्या प्रश्नाने पृथ्वी शॉ पडला गोंधळात, सांगितले गांगुली, पाँटिंगमधील एकाला निवडण्यास, पहा व्हिडिओ

रिषभ पंतसाठी आयपीएलमधील हा आहे सर्वात खास क्षण, पहा व्हिडिओ

– सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी

You might also like