क्रिकेट चाहते कदाचित दिवाळीपेक्षाही जास्त कशाची वाट पाहत असतील, तर ते म्हणजे टी20 विश्वचषक 2022 या स्पर्धेची. या स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. यामध्ये मोठमोठे विक्रमांचे मनोरे रचले जाणार आणि ते मोडलेही जाणार, यात तिळमात्र शंका नाही. अशात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याकडेही तीन मोठे विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. यातील दोन विक्रमात तो कर्णधार रोहित शर्मा याला पछाडू शकतो. कोणते आहेत ते विक्रम, चला जाणून घेऊया…
रोहितचे हे विक्रम मोडण्याची विराटला संधी
1. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आघाडीवर आहे. त्याच्या नावावर 3737 धावा आहेत. विराट कोहली (Virat Kohli) हा त्याच्यापेक्षा थोडा मागे आहे. विराटने टी20 विश्वचषकात आतापर्यंत 3712 धावा चोपल्या आहेत. दोघांच्याही फॉर्मबद्दल बोलायचं झालं, तर विराट रोहितपेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशात विराट रोहितचा हा विक्रम लवकरच आपल्या नावावर करू शकतो.
2. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहली दोन खेळाडूंच्या मागे आहे. यामध्ये पॉल स्टर्लिंग आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. स्टर्लिंगच्या खात्यात 344 चौकार आहेत, तर रोहितच्या खात्यात 337 चौकार आहेत. विराट 331 चौकारांसोबत तिसऱ्या स्थानावर आहे. विराटने त्याचा फॉर्म विश्वचषकातही कायम ठेवला, तर तो हा विक्रमही आपल्या नावावर करून अव्वल स्थान पटकावू शकतो.
3. ऑस्ट्रेलियात परदेशी फलंदाजाची सर्वोत्तम सरासरी
ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर विराटला फटकेबाजी करण्यास किती आवडते, हे सर्वांनाच माहितीये. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर परदेशी फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये विराटच्या पुढे इफ्तिखार अहमद, असेला गुनरत्ने आणि जेपी ड्युमिनी हे खेळाडू आहेत. गुनरत्ने आणि ड्युमिनी या विश्वचषकात खेळताना दिसणार नाहीयेत. तसेच, इफ्तिखार पाकिस्तान संघाकडून खेळेल. मात्र, तो सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. विराटने 64.42च्या सरासरीने ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकूण 451 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे सरासरीच्या बाबतीत तो पहिला क्रमांक गाठू शकतो.
या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विराटने आशिया चषकापूर्वी जवळपास तीन महिन्यांची विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले. विराटचा फॉर्म पाहून चाहत्यांमध्ये असा सूर आहे की, तो या स्पर्धेत नक्कीच धमाल करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संघांनो सावधान! टी20 विश्वचषकापूर्वी पावरफुल बनली दक्षिण आफ्रिका, ताफ्यात मॅचविनर पठ्ठ्याची एन्ट्री
मोठी बातमी! मॅच फिक्सिंगवर आयसीसीची कडक कारवाई, ‘या’ खेळाडूवर 14 वर्षांची बंदी