इंग्लंड आणि न्यूझीलॅंड चौथ्या वनडे सामन्यात आज राॅस टेलर वादळाचा चांगलाच तडाखा इंग्लंड संघाला बसला. टेलरने १४७ चेंडूत १८१ धावांची नाबाद वादळी खेळी केली.
न्यूझीलॅंडने नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३५ धावा केल्या.
त्यात जाॅनी बेरस्टाॅच्या १३८ तर जो रूटच्या १०२ धावांचा समावेश होता.
३३६ धावांचे लक्ष घेवून मैदानात उतरलेल्या न्यूझीलॅंडचे दोन्ही सलामीवीर ० धावा करुन तंबुत परतले. परंतू त्यानंतर मैदानात आलेल्या राॅस टेलर आणि कर्णधार केन विलीयम्सम यांनी चांगली भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
त्यानंतर मात्र राॅस टेलरने चांगलीच धडाकेबाज फलंदाजी करत १७ चौकार आणि ६ षटकारांची बरसात केली. परंतु इंग्लंडने दिलेलं ३३६ धावांचे लक्ष पुर्ण झाल्यामुळे मात्र त्याला द्विशतकला मुकावे लागले.
या सामन्यात त्याने केलेले विक्रम:
– चौथ्या क्रमांकावरील वनडेतील दुसरी मोठी खेळी. सर व्हीव्हीयन रिचर्ड यांनी नाबाद १८९ धावा केल्या होत्या.
-गेल्या ७ वर्षातील टेलरचे हे वनडेतील १६ वे शतक. विराट कोहली (३०) आणि हशीम आमला (१८) पहिल्या दोन स्थानावर.
– धावांचा पाठलाग करताना केलेल्या वनडेतील पाचव्या सर्वोच्च धावा. शेन वाॅटसन (१८५*), एमएस धोनी(१८३*), विराट कोहली (१८३), विराट कोहली (१८१*) हे पहील्या ४ स्थानांवर
– शेवटच्या ८ सामन्यात इंग्लंड विरुद्द टेलरने ११८च्या सरासरीने ७०८ धावा केल्या आहेत.
-धावांचा पाठलाग करताना केलेल्या न्यूझीलॅंकडून वनडेतील सर्वोच्च धावा.गप्टीलचा विक्रम मोडला.