इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या उर्वरित हंगामाला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी डियाजिओचे वरिष्ठ अधिकारी प्रथमेश मिश्रा यांना संघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
प्रथमेश मिश्रा हे सध्या जियाजिओ इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी आहेत. तसेच ते आता आरसीबी संघाची अतिरिक्त जबाबदारीही स्विकारणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे मालकी हक्क रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायवेट लिमिटेडकडे आहेत. ही कंपनी दारू उत्पादक डियाजियो इंडियाची सहाय्यक कंपनी आहे.
प्रथमेश मिश्रा यांच्यापूर्वी आरसीबीचे अध्यक्ष आनंद कृपालू होते, त्यांचा डियाजियो इंडियामधील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपला.
आयपीएल २०२१ मध्ये बेंगलोर चांगल्या फॉर्ममध्ये
आयपीएल २०२१ स्पर्धा एप्रिलमध्येच सुरु झाली होती. पण २९ सामन्यांनंतर कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा हंगाम स्थगित करावा लागला. आता या हंगामातील उर्वरित ३१ सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत.
आरसीबी आयपीएलमधील असा एक संघ आहे, जो पहिल्या हंगामापासून स्पर्धेचा भाग असूनही अजून विजेतेपद जिंकू शकलेला नाही. मात्र, यंदा आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी त्यांची कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे त्यांना विजयाचे प्रबळ दावेदारही म्हटले जात होते. आरसीबीने या हंगामातील त्यांचे सुरुवातीचे चारही सामने जिंकले होते. तसेच हा हंगाम स्थगित होण्यापूर्वी ७ पैकी ५ सामने जिंकण्यात यश आले होते, त्यामुळे ते गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सॅम करनने ५ विकेट्स घेत केली श्रीलंकेची वाताहत, मोठा भाऊ टॉमप्रमाणे केली ‘ही’ कमाल
विराटवर कुबेराची कृपा! एका इंस्टाग्राम पोस्टसाठी मिळतात ‘इतके’ कोटी रुपये
‘पंतचा तो झेल सोडणे पडले असते महागात, त्यावेळी विचार आला की…’ टीम साऊदीने व्यक्त केल्या भावना