आयपीएल 2022 स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. प्रत्येक संघाचे दोन किंवा तीन सामने शिल्लक असून, प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ मजल मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. अशात आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे पुढील वाटचाल कशी राहणार हे पाहूया.
शुक्रवारी (12 मे) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सला पराभूत केले. त्यामुळे आरसीबी, पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला. या विजयासह मुंबई 14 गुण मिळवून तिसऱ्या स्थानी काबीज आहे. तर गुजरात व चेन्नई अनुक्रमे 16 व 15 गुणांसह पहिल्या दोन स्थानावर आहेत. तर सर्वोत्तम रनरेटसह राजस्थान 12 गुण घेऊन चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. या सर्व संघांचे प्रत्येकी दोन सामन्या शिल्लक असून, काही अनपेक्षित निकाल न लागल्यास हेच संघ अव्वल चारमध्ये राहू शकतात.
सध्याच्या गुणतालिकेत आरसीबीचा क्रमांक सहावा असून, त्यांनी पाच विजय व सहा पराभव पत्करले आहेत. त्यांचा रनरेट -0.34 असा आहे. आता आगामी तीनही सामने जिंकणे त्यांना अनिवार्य असेल. त्याचवेळी मुंबई व राजस्थानने आपले उरलेले दोन्ही सामने गमवावे अशी त्यांना प्रार्थना करावी लागेल.
विशेष म्हणजे आरसीबीला आपले तीनपैकी दोन सामने पहिल्या चारमध्ये असलेल्या गुजरात व राजस्थानविरुद्ध खेळायचे आहेत. तर एक सामना ते हैदराबादविरुद्ध खेळतील. अशा स्थितीत आरसीबी पुढील आव्हान मोठे आहे.
आरसीबीला या तीन सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेल यांना आपल्या कामगिरीतील सातत्य टिकवून ठेवावे लागेल. तसेच गोलंदाजांना देखील आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे.
(Royal Challengers Banglore IPL 2023 Play Offs Equation)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वक्त बदल दिया! फ्लॉप सुरुवातीनंतर सूर्याने दाखवला ‘सुपला फॉर्म’, पाहा जबरदस्त आकडेवारी
‘हे केवळ त्याच्यासाठी’, दमदार कमबॅक केलेला चावला घेतोय आपल्याच मुलाकडून प्रेरणा