---Advertisement---

पुणेकर ऋतुराज गायकवाडसाठी धोनीने ‘या’ खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२०चा चौथा सामना आज खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता सुरु झाला आहे.

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने फलंदाज ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे या खेळाडूचे आयपीएलमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या अंबाती रायडूच्या जागी धोनीने गायकवाडला संधी दिली आहे. त्यामुळे रायडू या सामन्यात खेळताना दिसणार नाही. Ruturaj Gaikwad IPL Debut Against Rajsthan Royals

उजव्या हाताचा फलंदाज गायकवाड हा युएईला आल्यानंतर सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्याला चेन्नईच्या इतर खेळाडूंसह सराव सत्रात सहभागी होता आले नाही. पुढे दुसऱ्यांदा जेव्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्येही त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सहभागी होता आले नाही.

पण नुकत्याच झालेल्या तिसऱ्या कोरोना चाचणीत तो निगेटिव्ह आढल्यामुळे त्याने रविवारपासून सरावास सुरुवात केली होती. अशात आज राजस्थानविरुद्धच्या आयपीएल सामन्यात त्याला संधी मिळाल्यामुळे तो आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.

यापुर्वी गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. त्याने २१ प्रथम श्रेणी सामने खेळत १३४९ धावा केल्या आहेत. तर ५४ अ दर्जाचे सामने खेळत २४९९ धावा केल्या आहेत. शिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने २८ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ८४३ धावांची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल आणि प्रेक्षकांमधील नात आहेच खास, मुंबई- चेन्नई सामन्याने केले अधोरेखित

हैद्राबाद संघावर आली डोकं धरायची वेळ, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू पडू शकतो पूर्ण हंगामातून बाहेर

शून्यावर बाद होऊनही आयपीएलमध्ये फलंदाजाचे पहिल्यांदाच होतेय जोरदार कौतूक

ट्रेंडिंग लेख –

पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली

१९९२ क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे मार्टिन क्रो

आजच्या सामन्यात ‘हे’ ५ खेळाडू गाजवणार मैदान, ठरू शकतात गेम चेंजर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---