बांगलादेशात सुरू असलेल्या ढाका प्रीमियर लीग २०२१ मध्ये आणखी एक नवीन वाद निर्माण झाला आहे. अलीकडेच बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने पंचांशी गैरवर्तन केले होते. चालू सामन्यात स्टम्प उखडून खेळपट्टीवर फेकल्याने, त्याच्यावर तीन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली. तसेच, ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या स्पर्धेत असे काहीतरी घडले ज्यामूळे सर्वजण चकित झाले. या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शब्बीर रहमान चर्चेत आहे, जो यापूर्वी अनेक वादात सापडला होता.
खेळाडूवर फेकली वीट
ढाका प्रीमियर लीग २०२१ च्या सामन्यात डीओएचएस स्पोर्ट्स क्लब आणि शेख जमाल धानमंडी क्रिकेट क्लबचे संघ समोरासमोर होते. मैदानाबाहेर असूनही बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या शब्बीर रहमानने मैदानावर असे काहीतरी केले, जे आजपर्यंत पाहिले गेले नव्हते.
रहमान सामन्याचा भाग नव्हता तरीही शेख जमालचा फिरकीपटू इलियास सनी जेव्हा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करीत होता, तेव्हा त्याने सनीच्या अंगावर वीट फेकली. इतकेच नाही तर यानंतर त्याने सनीबाबत अर्वाच्च भाषेचा वापर करतात वर्णद्वेषी टिप्पणी केली. क्रिकेटविश्वात वर्णद्वेषाविरोधात अतिशय कठोर नियम आहेत. तरीही क्रिकेटपटूंनी ते गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही.
Sheikh Jamal Dhanmondi Club has lodged a complaint against Bangladesh cricketer Sabbir Rahman for racially abusing and throwing stones at one of their players, Elias Sunny, during a Dhaka Premier League T20 match #Cricket
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) June 17, 2021
रहमान विरोधात तक्रार केली दाखल
हा सामना संपल्यानंतर शेख जमाल यांनी ढाका मेट्रोपोलिसच्या क्रिकेट समितीला (सीसीडीएम) पत्र लिहून रहमानबद्दल तक्रार केली आणि त्याला शिक्षा करण्याची मागणी केली. या पत्रात त्याच्यावर वर्णद्वेषी शब्द वापरण्याचा देखील आरोप ठेवला आहे.
यापूर्वीही वादात अडकला होता रहमान
शब्बीर रहमानने बांगलादेशकडून ६६ वनडे , ११ कसोटी आणि ४४ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापूर्वीही तो अनेकदा वादात अडकला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये मैदानाबाहेरचे अनेक नियम मोडल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड आकारला गेला होता. याशिवाय जानेवारी २०१८ मध्ये एका सामन्यादरम्यान शब्बीर रहमानने मारहाण केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिशसह ‘या’ भारतीय भाषांमध्ये होणार WTC Final चे थेट प्रसारण; मराठीचा मात्र समावेश नाही
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा