यावर्षी १५ ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवासाठी लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. सर्वत्र तिरंगा यात्र निघताना दिसत आहेत. सर्वजण स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवताना दिसत आहे. तसेच सोशल मीडिया खात्याच्या प्रोफाईलवर देखील तिरंग्याचा फोटो ठेवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून थे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील दिग्गज तिरंगा शेअर करत आहेत. आता भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर देखील या ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही त्याच्या घरावर तिरंगा फडकवला आहे. सचिनने घरावर तिरंगा लावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, “मनातही तिरंगा आणि आता घरीही तिरंगा.” या पोस्टसोबतच त्याने स्वतःच्या इंस्टाग्राम आणि ट्वीटर खात्याचे प्रफाईल बदलून तिरंग्याचा फोटो ठेवला आहे.
https://www.instagram.com/reel/ChMus0mgPTR/?utm_source=ig_web_copy_link
सचिनच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. २०१३ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याच्या चाहत्यांमध्ये जराही घट झाल्याचे दिसत नाही. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या ३५.५ मिलियन आहे. १९८९ साली भारतासाठी पहिला सामना खेळणाऱ्या सचिनने असे अनेक विक्रम केले, जे आजही अबाधित आहेत. त्याने क्रिकेटच्या संपूर्ण कारकिर्दीत १०० शतक केले, जी कोणत्याही दिग्गजासाठी सोपी गोष्ट नाही.
१०० आंतरराष्ट्रीय शतक करणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. त्याव्यतिरिक्त त्याने राजकारणात देखील नशीब आजमावले आहे. त्याची राज्यसभेतील खासदाराची भूमिका पार पाडली आहे. सध्या तो भारतीय संघातून बाहेर असला, तरी त्याची आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या नेहमीच कामी येत असतो. सचिन मुंबई संघासाठी एका मेंटॉरची भूमिका पार पाडताना दिसला आहे. अनेकदा त्याला मुंबईच्या सामन्यादरम्यान मैदानात पाहिले गेले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Best Catch | ‘या’ खेळाडूने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल, पाहा व्हिडिओ
Video: मुंबई इंडियन्सच्या युवा फलंदाजाचा ‘द हंड्रेड’मध्ये कहर, सलग ४ चेंडूंवर ठोकले षटकार
ऑस्ट्रेलियाच्या ऍलानाची ‘किंग’ कामगिरी, ‘द हंड्रेड’मध्ये हॅट्रिक घेत विश्वविक्रम केला नावावर