आयपीएल २०२१ स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांना प्रारंभ झाला आहे. रविवारी (१० ऑक्टोबर) क्वालिफायरचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स संघाने शेवटच्या षटकात जोरदार विजय मिळवत आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. ते पाहून पत्नी साक्षी धोनीने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर होतोय विषय ठरतेय.
गुरू विरुद्ध शिष्य यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार यात काहीच शंका नव्हती. कारण या दोन्ही संघांनी आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला या हंगामात २ वेळेस पराभूत केले होते. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, या सामन्यात देखील दिल्ली कॅपिटल्स संघ विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल होणार. परंतु याउलट चित्र पाहायला मिळाले.
हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी धोनीने ३ चौकार मारत चेन्नई सुपर किंग्स संघाला हा सामना जिंकून दिला. या विजयानंतर स्टँड्समध्ये उपस्थित असलेल्या साक्षी धोनीला अश्रू अनावर झाले होते. ती आपली मुलगी झिवा धोनीला मिठी मारून या मोठ्या विजयाचा जल्लोष साजरा करत होती. तसेच हे आनंदअश्रू पाहून चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Pure love 😍😍
While #Dhoni is hitting at ground, wife #sakshi getting emotional at a time in joy.
It's खुशी के आंसू😍😎 #fixerkings #Sakshidhoni #MSDhoni #love #msdians #Thala #Dhoni #Finisher pic.twitter.com/MlvCgwhh1K
— Ashish Robinhood Pandey (@ashispandey1693) October 10, 2021
The finisher 🦁💛🔥👑 #Thala #Dhoni #WhistlePodu #IPL2021
Look At #SakshiDhoni Emotion 😍❤😊 https://t.co/ooCkRfS9FY— #TeamRakul (@TeamRakul10) October 10, 2021
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉने तुफानी ६० धावांची खेळी केली. तर कर्णधार रिषभ पंतने नाबाद ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना, ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूंमध्ये सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने ६३ धावांचे योगदान दिले. तर शेवटी एमएस धोनीने जोरदार आक्रमण केले. त्याने नाबाद १८ धावांची खेळी करत, षटकार मारून चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ गडी राखून प्रवेश केला. तसेच अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या-
उथप्पाचे लाडक्या लेकाला ‘बर्थडे गिफ्ट’! चेन्नईला महत्त्वपूर्ण खेळी करत पोहोचवले फायनलमध्ये