भारतीय फुटबॉलमधील नामांकित फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या साळगावकर एफसी संघाने आपला वरिष्ठ संघ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साळगावकर एफसीच्या मालकांनी गोवा फुटबॉल असोसिएशनकडे आगामी हंगामासाठी आपल्या वरिष्ठ पुरुष संघाची नोंदणी केली नाही. 67 वर्ष भारतीय फुटबॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे फुटबॉलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.
एका वृत्तसंस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी गोवा प्रो लीग स्पर्धेसाठी साळगावकर संघाने नोंदणी केली नाही. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, ते आता वरिष्ठ संघ, अंडर 18 व अंडर 20 हे संघ बंद करतायेत. त्याचवेळी अंडर 13 व अंडर 15 हे संघ मात्र त्यांचे योगदान देत राहतील.
साळगावकर फुटबॉल क्लब हा गोवा तसेच भारतातील मान्यवर फुटबॉल क्लबपैकी एक होता. गोवा मुक्त झाल्यानंतर बनलेला हा पहिला क्लब ठरलेला. 1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या क्लबचे लोकार्पण केले गेलेले. 1988 फेडरेशन कप व 1991 मध्ये ड्युरंड कप जिंकलेला. त्यानंतर 1999 मध्ये ड्युरंड कप व एनएफएल जिंकणारा तो पहिला संघ ठरलेला. त्यांच्या संघ बंद करण्याच्या निर्णयावर गोव्यातील दुसरा प्रमुख फुटबॉल क्लब असलेल्या डेम्पो संघाच्या संघमालकांनीही दुःख व्यक्त केले. साळगावकर व डेम्पो एफसी यांना द ग्रेट गोवा डर्बी असे म्हटले जाते.
(Salgaocar FC to cease senior team operations and will instead focus only on under-13 and under-15s)
महत्वाच्या बातम्या
पुणेरी बाप्पा Qualifier 2 मधून आऊट, कोल्हापूर टस्कर्सला मिळालं फायनलचं तिकीट
बुमराह कधी करणार पुरनागमन? विश्वचषकाचे वेळापत्रक येताच समोर आली मोठी अपडेट