आशिया चषक 2023 चे वेळापत्रक अखेर समोर आले आहे. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका देशात खेळवली जाणारी ही स्पर्धा सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ आशिया चषक 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे. या वेळापत्रकानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने निराशा व्यक्त केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात आशिया चषक 2023च्या यजमानपदावरून मोठा वाद पेटला होता. हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून आशिया चषकाच्या यजमानपदाचा तोडला कसाबसा निघाला. या मॉडेलनुसार भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित केले जाणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी भारतीय संघ आशिया चषकातील आपला पहिला सामना यजमान पाकिस्तानसोबत खेळणेल. हा सामना श्रीलंकेतील कँडीमध्ये आयोजित केला गेला आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि भारत हे ग्रुप ए मध्ये आहेत. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आहेत.
पाकिस्तान स्पर्धेतील आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध पाकिस्तानमध्ये खेळेल. त्यानंतर दोनच दिवसांनी श्रीलंकेत भारताविरुद्ध त्यांचा सामना असणार आहे. सुपर फोर मधील देखील त्यांचा एक सामना पाकिस्तानात होईल तर इतर सामने श्रीलंकेत होणार आहेत. याच मुद्द्यावर बोलताना बट म्हणाला,
“पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या खेळाडूंची चिंता नाही. वनडे सामने असताना खेळाडूंना सातत्याने प्रवास करावा लागेल. एक सामना खेळून प्रवास करत दुसरा सामना खेळून पुन्हा पाकिस्तानात येणे, ही दमवणारी गोष्ट आहे. बोर्ड आधीपासूनच खेळाडूंची पर्वा करत नाही.”
आशिया कपच्या या मॉडेलनुसार पाकिस्तान संघ सुपर फोरसाठी पात्र झाल्यानंतर ए 1 म्हणून आपला पहिला सामना पाकिस्तानात खेळेल. त्यानंतर इतर दोन सामने कोलंबो येथे होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होईल.
(Salman Butt Slams PCB On Asia Cup Timetable)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, ‘जर आम्ही ओव्हलमध्ये जिंकू शकतो, तर…’
Ashes 2023 । ख्रिस वोक्सने घेतलं विकेट्सचं पंचक! दुसऱ्या दिवशी 18 धावां करून ऑस्ट्रेलिया सर्वबाद