अवघ्या काही तासातच क्रिकेट चाहत्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी,दोन्ही संघातील खेळाडू आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. अशातच संजना गणेशनने देखील या मोठ्या सामन्यापूर्वी जसप्रीत बूमराहची मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी १५ मार्च रोजी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. तसेच, लग्नानंतर पहिल्यांदाच पत्नी संजनाने पती बुमराहची मुलाखत घेतली आहे.मुलाखतीच्या वेळी बुमराह भलताच खुश दिसत होता.मुलाखत सुरू होण्यापूर्वी संजनाने बुमराहचे स्वागत केले आणि म्हटले की, “तुला पाहून बरे वाटले.” बुमराहने उत्तर देत म्हटले की, “मी देखील तुला कुठेतरी पाहिलं आहे.” यावर संजना म्हणाली,”मी इथेच आहे जवळपास.”
जेव्हा संजनाने त्याला विचारले की, “तुला आता कसं वाटत आहे?” यावर बुमराहने मजेशीर रित्या उत्तर देत म्हटले की,”तुला चांगलच माहीत आहे, मला कसं वाटत आहे ते.”
त्यानंतर संजना त्याला मुलाखतीत कुठले प्रश्न विचारले जातील याबाबत माहिती देताना दिसून आली. यावेळी देखील बुमराहने तिला मजेशीररित्या विचारले की, “कॅमेराकडे पाहू की तुझ्याकडे पाहू.” यावर प्रतिसाद देत संजना म्हणाली की,” तुला कॅमेराकडे पाहायचं आहे.” तर तो म्हणाला की,”प्रयत्न करेल.”
या मुलाखतीत, बुमराहने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोबद्दल आठवणी सांगितल्या. तसेच आपल्या बालपणीच्या आठवणी देखील सांगितल्या.(Sanjana ganeshan interview with jasprit bumrah before WTC final)
.@Jaspritbumrah93 brings out his goofy side as he sits down for a candid interview with a familiar face 😉
📹: @ICC@SanjanaGanesan #OneFamily #MumbaiIndianspic.twitter.com/L5F7WojmGY
— Mumbai Indians (@mipaltan) June 17, 2021
या मुलाखतीत बुमराहने अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. बुमराह लहान असताना आपल्या बहिणीसोबत क्रिकेट खेळायचा. त्याने शालेय जीवनात क्रिकेटपटू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. या सर्व गोष्टी त्याने मुलाखती दरम्यान सांगितल्या.
या मुलाखतीत बुमराहने सांगितले की, लग्न केला तो दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस होता. संजना आणि जसप्रीत बुमराह या दोघांचा लग्न सोहळा गोव्यात पार पडला होता. बुमराहने लग्नातील आठवणींना उजाळा देत म्हटले की, ‘दोघेही लग्नाच्या वेळी एकमेकांना पाहत होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या विवाहाच्या फोटोला संजनाने कॅप्शन दिले होते.’ ही मजेशीर मुलाखत पाहून क्रिकेट चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील WTC चा अंतिम सामना? वाचा एका क्लीकवर
–जडेजाला अंतिम ११मध्ये संधी दिलीच पाहिजे,माजी खेळाडूने जडेजावर व्यक्त केला विश्वास
–कारकिर्दीदरम्यान होणाऱ्या टीकांना कसा सामोरा जातोस? अजिंक्य रहाणेने दिले मन जिंकणारे उत्तर