Loading...

कोल्हापूरच्या सौरभ पाटीलची प्रो कबड्डीच्या प्रदार्पणातच चमकदार कामगिरी

प्रो कबड्डी सीजन ७ चा शेवटचा लेग ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. या लेगमध्ये काल (६ ऑक्टोबर) पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना झाला. बंगाल वॉरियर्सने आधीच सेमी फायनलमध्ये धडक मारल्यामुळे त्यांनी या सामन्यात युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. त्यात महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलचाही समावेश होता. त्याने या सामन्यातून प्रो कबड्डीत पदार्पण केले.

Loading...
Loading...

बंगाल वॉरियर्सने हा सामना ४१-६९ असा गमावला असला तरी युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. प्रो कबड्डीत पदार्पण करणाऱ्या कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने सुपर टेन पूर्ण केला.

सौरभने यासामन्यात १६ रेड मध्ये ११ रेड गुण मिळवले. याआधी सौरभ पाटीलने महाराष्ट्र कुमार गट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली ४५ व्या राष्ट्रीय कुमार गट स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक पटकावून दिले आहे.

Loading...
You might also like