क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज रेलीगेशन फेरीच्या दुसऱ्या दिवशी पालघर काझीरंगा रहिनोस, रायगड मराठा मार्वेल्स, नंदुरबार हिमालयन ताहर्स व सांगली सिंध सोनिक्स संघांनी प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करत विजय मिळवला.
पहिल्या सामन्या रायगड मराठा मार्वेल्स विरुद्ध परभणी पांचाला प्राईड यांच्यात झाली. रायगड संघाने 37-24 असा विजय मिळवला. रायगड कडून रुतिक पाटील ने सर्वाधिक 16 गुण मिळवले तर पकडीत राज जंगम व जयेश गावंड यांनी प्रत्येकी 4 पकडी केल्या. तर पालघर काझीरंगा रहिनोस संघाने लातूर विजयनगारा विर्स संघाचा 56-35 असा एकतर्फी पराभव केला. पालघर कडून राहुल सवर ने सर्वाधिक 20 गुण मिळवले तर ऋषिकेश दळवी ने 7 पकडी केल्या.
धुळे चोला वीरांस विरुद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स यांच्या अटीतटीची लढत बघायला मिळाली. मध्यंतराला 20-14 अशी आघाडी नंदुरबार संघाकडे होती त्यानंतर मात्र धुलेच्या मितेश कदम ने आक्रमक चढाया करत सामना फिरवत 38-36 अशी आघाडी मिळवली पण शेवटच्या मिनिटाला 39-38 असा नंदुरबार संघाने विजय मिळवला. नंदुरबार संघाच्या तेजस काळभोर ने सर्वाधिक 18 गुण मिळवले.
सांगली सिंध सोनिक्स विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात अंत्यत चुरशीची लढत झाली. मध्यंतराला 18-18 असा बरोबरीत असलेला सामना सांगली संघाने 40-36 असा विजय मिळवला. वृषभ साळुंखेच्या अष्टपैलू खेळीने सांगली संघाने विजय प्राप्त केला. (Second straight win for Raigad Maratha Marvels, Palghar Kaziranga Rhinos in relegation round)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या लढतीत नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाचा विजय
सांगली सिंध सोनिक्स संघाची रत्नागिरी अरावली ॲरोज संघावर मात