बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांची मालिका घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध खेळायची आहे, जी 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विश्वचषक 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरला नसल्यामुळे या मालिकेसाठी नियमित कर्णधार शाकिब अल हसन उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शनिवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नजमुल हुसेन शांतोला नवीन कसोटी कर्णधार म्हणून घोषित केले आणि तो रेड बॉल फॉरमॅटमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करणारा 13वा खेळाडू असेल. अलीकडेच त्याने शाकिबच्या गैरहजेरीत विश्वचषकातही कर्णधारपद भूषवले होते.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी स्पर्धेत दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकावे लागले होते. डावखुरा अष्टपैलू खेळाडू 19 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाविरुद्ध खेळू शकला नाही आणि त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी तो स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या अनुपस्थितीत नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) याने दोन्ही सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याच वेळी, आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी पत्रकार परिषदेत पुष्टी केली की न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नझमुल हुसेनला कर्णधार बनवण्यात आले आहे.
कसोटी संघाचा उपकर्णधार लिटन दास (Liton Das) नुकताच पिता झाला आहे. त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आहे आणि त्याला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी न्यूझीलंड मालिकेत न वगळण्याची इच्छा आहे, असे क्रिकबझने वृत्त दिले आहे. अशा परिस्थितीत नियमित कर्णधाराला दुखापत झाल्यामुळे आणि उपकर्णधार उपलब्धता नसल्यामुळे बीसीबीला नवीन कर्णधाराचा पर्याय निवडावा लागला.
2017 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या नझमुल हुसेन शांतोने आतापर्यंत बांगलादेशसाठी 23 कसोटी सामने खेळले असून 44 डावात 29.83 च्या सरासरीने 1283 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून चार शतके आणि तीन अर्धशतकेही झळकली आहेत. (Shakib has been replaced by Bangladesh as the new captain for the Test series against New Zealand)
म्हत्वाच्या बातम्या
काय होतास तू काय झालास तू! इम्रान खान सोडून WC Finalसाठी सर्व विश्वविजेते कॅप्टन लावणार हजेरी, कारण धक्कादायक
World Cup 2023 Final पूर्वी रोहितबद्दल नेहराचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘तो फक्त विराटमुळेच…’