इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील ४१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यादरम्यान बरेचसे विक्रम घडले. त्यातील एक विक्रम कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याचा होता. या सामन्यादरम्यान श्रेयसने खास अर्धशतक केले आहे.
हा सामना श्रेयसचा (Shreyas Iyer) कर्णधार म्हणून आयपीएलमधील ५०वा (Most IPL Matches As Captain) सामना होता. तो आयपीएलमध्ये ५० सामने खेळणारा (Fifty IPL Matches As Captain) दहावाच कर्णधार बनला आहे. त्याच्यापूर्वी एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर, ऍडम गिलख्रिस्ट, डेविड वॉर्नर, शेन वॉर्न, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडूलकर आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ५० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्त्व केलेल्या श्रेयसवर २०१८ हंगामाच्या मध्यात नेतृत्त्वपदाचा भार दिला गेला होता. यासह तो दिल्ली संघाचे नेतृत्त्व करणारा सर्वात युवा कर्णधार बनला होता. त्याने दिल्लीकडून कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळताना ४० चेंडूत नाबाद ९३ धावा फटकावल्या होत्या. विशेष म्हणजे, त्याने कर्णधार म्हणून पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच खेळला होता. पुढे २०१९ आणि २०२० मध्येही त्याने दिल्ली संघाचे नेतृत्त्व केले होते.
मात्र पुढे खांद्याच्या सर्जरीमुळे तो आयपीएल २०२१चा अर्धा हंगाम उपस्थित राहू शकला नाही व दिल्लीची सूत्रे रिषभ पंतच्या हाती गेली. त्यानंतर आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात कोलकाता संघाने श्रेयसला विकत घेतले आणि त्याच्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
श्रेयसने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ५० सामने खेळताना २४ सामने जिंकले आहेत, तर २३ सामने गमावले आहेत. उर्वरित २ सामने बरोबरीत सुटले आहेत. त्याची आयपीएलमधील विजयी सरासरी ५१.०२ इतकी आहे.
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने:
२०४ सामने – एमएस धोनी
१४० सामने – विराट कोहली
१३७ सामने – रोहित शर्मा
१२९ सामने – गौतम गंभीर
७४ सामने – ऍडम गिलख्रिस्ट
६९ सामने – डेविड वॉर्नर
५५ सामने – शेन वॉर्न
५३ सामने – विरेंद्र सेहवाग
५१ सामने – सचिन तेंडूलकर
५० सामने – श्रेयस अय्यर*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय क्रिकेटरने निवडली ‘सार्वकालिन आयपीएल इलेव्हन’, धोनीकडे नेतृत्त्वाची धुरा; पाहा संघ
“जर तो धोनीचा चाहता असेल, तर त्याने त्याच्याकडून शिकले पाहिजे”, पंतला भारतीय दिग्गजाचा सल्ला