श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गॉल येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. यजमान संघाचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने (Dimuth Karunaratne)याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय श्रीलंकेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसले, नॅथन लायन (Nathan Lyon) याने श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आली असता त्यांची सुरूवात अडखळतच झाली. त्यातच स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) हा धावबाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) अवघ्या २५ धावांवर बाद झाला. नंतर मार्नस लॅब्युशेन बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या स्मिथने उस्मान ख्वाजाच्या साथीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र २०व्या षटकात रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर स्मिथ स्ट्राईकवर होता. मेंडिसने चेंडू टाकला असता तो स्मिथच्या पॅडला लागला आणि क्षेत्ररक्षकांनी पायचीतचे जोरदार अपील केले. त्यावेळी पंचानी कोणताही इशारा केला नाही. त्यादरम्यान पॅडवर लागलेला चेंडू ऑफ साइडला गेला असता स्मिथने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निरोशन डिकवेलाने चेंडू पकडून तो मेंडिसच्या दिशेने फेकला.
ख्वाजा हा आपल्या स्ट्राईकवर असता स्मिथला काही सुचत नव्हते. तो आपली विकेट वाचवण्यासाठी पळाला, तेव्हा मात्र फार उशिर झाला होता. डिकवेला आणि मेंडिस यांनी मिळून स्मिथला धावबाद केले. बाद झाल्यावर तो खूप रागात दिसत होता. नेहमी शांत आणि विनोदी स्वभाव अशी ओळख असलेल्या स्मिथचा हा चेहरा पाहता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Steve Smith usually doesn't lose his cool 👀#SLvAUS #stevesmith pic.twitter.com/sxKdJaYOK3
— A True Cric Fan (@atruecricfan) June 29, 2022
याआधी आपण अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धावबाद होताना पाहिले आहे. त्यात मिशेल स्टार्क आणि कायरन पोलार्ड यांचा किस्सा चांगलाच रंगला आहे. आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) २०१४च्या हंगामात स्टार्क रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून गोलंदाजी करताना स्ट्राईकवर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा पोलार्ड होता. त्या दोघांमध्ये झालेला वाद इतका मोठा होता की पोलार्डने त्याच्या दिशेने बॅट फेकली. नंतर स्टार्कने संधी मिळताच त्याला ज्याप्रकारे धावबाद केले होते ते पाहण्यासारखे होते.
श्रीलंके विरुद्ध बाद झाल्यावर स्मिथ ड्रेसिंगरूमकडे परतत असताना त्याने ख्वाजाला इशाऱ्याने तू परत का नाही आला असे विचारले. ड्रेसिंगरूममध्ये आल्यावरही त्याचा राग शांत झाला नव्हता. त्याने ११ चेंडूत ६ धावा केल्या.
ख्वाजाने ७१ धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७ विकेट्स गमावत २७६ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा संघ २१२ धावांवरच सर्वबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाने ६४ धावांची आघाडी घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध कोहली करू शकतो ‘विराट’ खेळी, सराव सत्रात मिळाले स्पेशल संकेत
भारतासाठी धोक्याची घंटा! बहुप्रतिक्षित पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर
भारताने दिलेली जखम आफ्रिकेच्या जिव्हारी, इंग्लंड दौऱ्यापूर्वी लागला मोठा झटका