सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या महिला क्रिकेेट संघात टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला टी20 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. या संघात दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 11 डिसेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा 4 धावांनी पराभव केला. भारताच्या स्मृती मंधना हीने भारताच्या महिला क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले आहे. टी20 सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपल्या नावाची नोंद केली.
रविवारी खेळलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या स्मृती मंधना (Smriti Mandhana) हीने विक्रम केला. तिने टी20 सामन्यात आव्हानाचा पाठालाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपल्या नावाची नोंद केली. तिने या सामन्यात 49 चेंडूत 79 धावा केल्या. या डावात तिने 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. तिची ही खेळी पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाची खेळी आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर स्मृती मंधना हीच आहे. तिने 2019मध्ये न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध 86 धावांची खेळी केली होती. या यादीतील दुसरे नाव देेखील मंधनाचेच आहे. तिने 2022मध्ये इंग्लंड विरुद्ध 79 धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे ही यादी स्मृतीच्या नावाने भरलेली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 1 बाद 187 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या महिला संघाने देखील 5 बाद 187 धावा केल्या. त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने निश्चित केला गेला. सुपर ओव्हरमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 धावा केलेल्या. याचे प्रत्युत्तर देेताना ऑस्ट्रेलिया संघाला 16 धावा करता आल्या आणि भारताच्या महिला संघानेे हा सामना 4 धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरवर घातलेली कर्णधारपदाची बंदी चुकीची! स्टीव स्मिथकडूनही मिळाला पाठिंबा
भारतीय संघाच्या दोन खेळाडूंनाच जमलाय ‘हा’ खास पराक्रम; एक स्म्रीती मंधाना, तर दुसरा…