fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

४२वे वनडे शतक केल्यानंतर विराट कोहलीचे़ गांगुलीने असे कले कौतुक…

रविवारी(11 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

विराटच्या या शतकी खेळीनंतर त्याचे अनेकांनी कौतुक केले. भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीनेही कौतुक करताना विराट शानदार खेळाडू असल्याचे म्हटले आहे.

विराटने या सामन्यात 125 चेंडूत 120 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटचे हे वनडे क्रिकेटमधील 42 वे शतक आहे.

विराटने हे शतक केल्यानंतर गांगुलीने विराटचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘विराट कोहली वनडे क्रिकेटमधील मास्टर क्लास आहे. काय शानदार खेळाडू आहे.’

विराटने या सामन्यात वनडेतील 42 वे शतक करण्याबरोबरच वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत गांगुलीला मागे टाकत 8 वे स्थान मिळवले आहे. विराटच्या वनडेत 238 सामन्यात 59.71 च्या सरासरीने 11406 धावा झाल्या आहेत. तर गांगुलीने वनडेत 311 सामन्यात 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२०मध्ये अजिंक्य रहाणे या संघाकडून खेळणार?

श्रेयस अय्यरबद्दल सुनील गावस्करांनी केले मोठे भाष्य

विराट वनडेत करणार ‘एवढी’ शतके, भारताच्या माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

You might also like