श्रीलंका आणि बांगलादेश या संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेश संघाने श्रीलंका संघाला धूळ चारत १०३ धावांनी मोठा विजय मिळवला होता. या सामन्यात मुश्फिकुर रहिमने १२५ धावांची तुफानी खेळी केली होती. तो या खेळीमुळे चर्चेत आलाच, परंतु तो आणखी एका कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून राहिला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघातील खेळाडूला मुश्फिकुर रहिमने जे काही म्हटले होते, ते स्टंप माईकमध्ये कैद झाले आहे. त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, श्रीलंकन संघ धावांचा पाठलाग करत असताना दनुष्का गुणातिलका आणि पथुम निसंका हे दोघेही फलंदाजी करत होते. त्यावेळी कर्णधाराने १२वे षटक टाकण्याची जबाबदारी फिरकी गोलंदाज मेहडी हसनला दिली होती. याच षटकातील ५ व्या चेंडूवर गुणातिलकाने रक्षात्मक शॉट खेळला, ज्यावर निसंकाने एक धाव घेण्याची मागणी केली होती. परंतु गोलंदाज मेहडी हसनने डाईव्ह मारत तो चेंडू अडवला होता.त्यावेळी त्याला डाईव्ह मारावी लागली कारण,निसंका त्याच्यासमोर उभा होता. त्यावेळी यष्टीमागे उभा असलेल्या मुश्फिकुर रहिमने बांगला भाषेमध्ये म्हटले की,”जर तो तुझ्यासमोर आला तर धक्का मारून खाली पाड.”
https://www.facebook.com/110737831095162/videos/2853785378205532/?app=fbl
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना ४८.१ षटकात सर्व बाद २४५ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये बांगलादेश संघाकडून मुश्फिकुर रहीमने उत्कृष्ट फलंदाजी करत, १२७ चेंडूत १२५ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने १० चौकार लगावले होते. तर महमुद्दुल्लाने ५८ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघाला DLS Methodने ४० षटकांत अवघ्या १४१ धावा करता आल्या. यासोबतच बांगलादेश संघाने हा सामना १०३ धावांनी आपल्या नावावर केला. बांगलादेश तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-०ने पुढे आहे. मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना ढाका येथे २८ मे रोजी होणार आहे.
हेही वाचा-
–धोनी-पंतमुळे साहाच्या कारकिर्दीला सुरूंग; म्हणाला, मग अर्धशतक करा वा शतक, सर्वकाही व्यर्थ...
–आळशीपणाचा कळस! क्रिकेटविश्वातील सर्वात आळशी खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, रोहित या भूमिकेत
–‘उनाडकटचे पुनरागमन दूरच, त्याला शेवटच्या ३० खेळाडूंमध्ये जागा मिळणार नाही,’ माजी प्रशिक्षकाचा दावा