दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध पाचवा टी२० सामना २५ धावांनी जिंकून मालिकेत ३-२ असा विजय मिळवला. या सामन्यात एडेन मार्करम आणि क्विंटन डी कॉक यांनी दुसर्या गड्यासाठी १२७ धावांची भागीदारी करत सामना पालटला. सामनावीर मार्करमने ७० धावा केल्या, ज्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धावा ठरल्या. डी कॉकने आपला चांगला फॉर्म कायम ठेवला आणि ४२ चेंडूत ६० धावा केल्या. मार्करमला सामनावीर पुरस्काराने तर, दक्षिण आफ्रिकेचा चायनामन फिरकीपटू तबरेज शम्सीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
हा सामना जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ यशस्वी ठरला असला तरीही, सामन्यादरम्यान एक घटना घडली ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली.
अखेरच्या चेंडूवर घडली अशी घटना
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर यान मल्डर फलंदाजी करत होता. आकर्षक चेंडू टाकणारा वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओबेद मेकॉय याने हा चेंडू स्लोवर बाउन्सर पद्धतीने टाकला. मात्र, हा चेंडू काहीसा लेग साइडला पडून यष्टीरक्षकापर्यंत गेला. मल्डर याला हा चेंडू वाईड असेल असे वाटले. मात्र, मैदानी पंचांनी हा चेंडू वैध ठरवून दक्षिण आफ्रिकेचा डाव संपल्याचे जाहीर केले. त्या चेंडूचा रिप्ले पाहिल्यानंतर हे स्पष्टपणे जाणवत होते की, चेंडू वाईड हवा होता. त्यामुळेच, दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू निराश झाले.
Worst umpiring ever 🤣🤣🤣 pic.twitter.com/4fd9DwRy74
— ribas (@ribas30704098) July 4, 2021
दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूंनी दिली प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने ट्विटरवर ट्विट करत, ‘अरे काय चाललंय. हा चेंडू वाईड नव्हता का?, असे उपहासात्मकपणे विचारले.
Shocker
— AB de Villiers (@ABdeVilliers17) July 3, 2021
स्टेन प्रमाणेच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याने देखील ‘शॉकर’ असे एका शब्दात उत्तर दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
अस्सल गिफ्ट! भज्जीला ४१व्या वाढदिवशी मिळाली ‘खास’ भेट; पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ
धोनीच्या काळात चमकलेली ‘कुलचा’ जोडी करणार ‘लंकादहन’, दिग्गजाकडून एकत्र खेळवण्याची मागणी