क्रिकेट खेळात खेळाडूंना अनेक दूखापतींना सामोरे जावे लागते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे भारताचा २०२०-२०२१चा ऑल्ट्रेलिया दौरा. त्या दौऱ्यावर भारताच्या तब्बल १२-१३ खेळाडूंना दुखापतीला तोंड देत संघाबाहेर पडावे लागले होते. तर आताही भारताच्या काही प्रमुख खेळाडूंना दुखापतीने ग्रासलेले आहे. अशात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापतींवर चिंता दर्शवली आहे.
यावर गावस्कर म्हणाले, “भारतीय खेळाडूंच्या दुखापतींकडे लक्ष दिले गेले पाहिजे. जर नीट ध्यान दिले तर दिसेल, मागच्या काही काळात भारतीय खेळाडूंना सर्वात जास्त हॅमस्ट्रींगच्या दुखापतीला जास्त तोंड द्यावे लागले आहे. बीसीसीआयने याची नोंद घेत काहीतरी केले पाहिजे. जेणेकरुन त्यासंबंधीतचे कारणे समजतील आणि खेळाडू हॅमस्ट्रींगच्या दुखापती पासून दुर राहतील.”
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)