सुरेश रैना हा भारताचा असा क्रिकेटपटू आहे जो त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि शानदार क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. रैना टीम इंडियासाठी खूप स्पेशल खेळाडू राहिला आहे. तो सध्याच्या आयपीएल हंगामात (आयपीएल 2024) हिंदी समालोचन करतोय. त्यानं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. 2010 मध्ये सुरेश रैना आजच्याच दिवशी टी20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला होता.
सुरेश रैनानं हे शतक टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लगावलं होतं. या सामन्यात त्यानं 60 चेंडूत 101 धावांची खेळी खेळली होती. आपल्या या शानदार खेळीत त्यानं 9 चौकार आणि 5 षटकार लगावले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट गमावून 186 धावा केल्या होत्या. सुरेश रैनानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही खेळी खेळली होती.
धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम 20 षटकांत 5 विकेट गमावून 172 धावाच करू शकली. संघासाठी सलामीवीर जॅक कॅलिसनं 54 चेंडूत सर्वाधिक 73 धावा केल्या होत्या. त्यानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. कॅलिसला सोडून दक्षिण आफ्रिकेचे इतर सर्व फलंदाजी अपयशी ठरले होते.
#OnThisDay in 2010, @ImRaina smashed a 60-ball 101 in the 2010 Men’s #T20WorldCup to become the first 🇮🇳 batsman to score a century in the shortest format.
WATCH his 🔥 innings against 🇿🇦, which consisted of 9️⃣ fours and 5️⃣ sixes 👀 pic.twitter.com/DqjZY3ocBH
— T20 World Cup (@T20WorldCup) May 2, 2020
‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना भारतासाठी तिन्ही फॉरमट खेळणारा खेळाडू होता. त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी 18 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी20 सामने खेळले. कसोटीच्या 31 डावांत त्यानं 26.48 च्या सरासरीनं 768 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 1 शतक आणि 7 अर्धशतक लगावले.
सुरेश रैना सर्वाधिक ओळखला जातो तो त्याच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी. तो या फॉरमॅटचा ‘स्पेशलिस्ट’ खेळाडू मानला जायचा. आपल्या उमेदीच्या काळात त्यानं भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. सुरेश रैनानं 194 एकदिवसीय डावांमध्ये फलंदाजी करताना 5615 धावा केल्या आहेत. त्यानं 35.31 च्या सरासरीनं 5 शतक आणि 36 अर्धशतक ठोकली आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये रैनानं 66 डावांमध्ये 29.18 ची सरासरी आणि 134.87 च्या स्ट्राईक रेटनं 1605 धावा ठोकल्या. या दरम्यान त्यानं 1 शतक आणि 5 अर्धशतक लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
36 वर्षाच्या खेळाडूनं आयपीएलमध्ये पदार्पण करून रचला इतिहास! चेन्नईच्या प्लेइंग 11 मध्ये मिळाली जागा
मयंक यादव पुन्हा जखमी झाल्यानं संतापला ब्रेट ली, लखनऊच्या मॅनेजमेंटला धरलं जबाबदार