यंदाच्या टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 21वा सामना आज (10 जून) रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेची धुरा एडन मारक्रमच्या हाती आहे. तर बांग्लादेशची धुरा युवा नजमुल हुसेन शांतो याच्याकडे आहे. दक्षिण आफ्रिकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. ग्रुप-ड मध्ये दक्षिण आफ्रिका शीर्ष स्थानी आहे. तर बांग्लादेशनं यंदाच्या टी20 विश्वचषकात 1 सामना खेळला आहे. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे देन्ही संघांमध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ ग्रुप-ड मध्ये समाविष्ट आहेत. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत 4 गुणांसह शीर्ष स्थानी आहे. तर बांग्लादेश 2 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका- रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन
बांग्लादेश- तन्झिद हसन, जाकेर अली, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहिद ह्रदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं आठही सामने जिंकून वर्चस्व गाजवलं आहे. तर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 3 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं सर्व सामने जिंकून वर्चस्व गाजवलं आहे. बांग्लादेशसमोर आज दक्षिण आफ्रिकेचं खूप मोठं आव्हान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दु:खद बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन
“तुम्ही कोणीही असला तरी असं करु शकत नाही…” गावसकरांचा सिराजला टोला
राखीव खेळाडूंनी लूटला चाहत्यांप्रमाणेच भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद