---Advertisement---

ब्रायन लारा म्हणतात, या संघात आहे टी२० विश्वचषक जिंकण्याची क्षमता

On: गुरूवार, जानेवारी 2, 2020 7:52 PM
---Advertisement---

यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पुरुष टी20 विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार ब्रायन लारा यांनी म्हटले आहे.

लारा इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार म्हणाले, ‘मला वाटते भारतीय संघ जी स्पर्धा खेळतात ती जिंकण्यासाठी सक्षम आहेत. मला वाटते विराट कोहली आणि भारतीय संघाने समजून घेतले पाहिजे की प्रत्येकजण भारताला लक्ष्य करेल.’

‘प्रत्येक संघाला माहित आहे की एक वेळ अशी असेल एक संघ भारत विरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळेल आहे. मग तो उपांत्यपूर्व सामना असेल किंवा उपांत्य सामना असेल किंवा अंतिम असेल.’

भारतीय संघाने याआधी 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला आहे. त्यानंतर मात्र ही स्पर्धा जिंकण्यात भारताला अपयश आले आहे. तसेच भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही शेवटची आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकली आहे.

त्यामुळे भारतीय संघ मागील काही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्यात आलेले अपयश 2020 चा टी20 विश्वचषक जिंकून मागे टाकण्याचा प्रयत्न करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---