गुरुवारी (१३ नोव्हेंबर) भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहचला. त्यानंतर आता शनिवारपासून(१४ नोव्हेंबर) भारतीय संघाने सरावास सुरुवात केली आहे. त्याचे फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केले आहेत.
भारतीय संघ जवळपास अडीच महिन्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. पण त्याआधी भारतीय संघातील सर्व सदस्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. पण असे असले तरी त्यांना क्वारंटाईनदरम्यान सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता भारतीय संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.
बीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसते की खेळाडूंनी मैदानावर सराव करण्याबरोबरच जीममध्येही घाम गाळला आहे. या फोटोंमध्ये हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, हनुमा विहारी हे खेळाडू मैदानात धावताना तर दीपक चाहर, चेतेश्वर पुजारा, टी नटराजन, श्रेयस अय्यर असे अनेक खेळाडू जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत.
Two days off the plane and #TeamIndia had their first outdoor session today. A bit of 🏃 to get the body moving! #AUSIND pic.twitter.com/GQkvCU6m15
— BCCI (@BCCI) November 14, 2020
Once out, the boys also hit the gym!💪 pic.twitter.com/X3QL3uHQJy
— BCCI (@BCCI) November 14, 2020
असा होणार आहे ऑस्ट्रेलिया दौरा –
२७ नोव्हेंबरपासून ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु होईल. त्यानंतर ४ ते ८ डिसेंबर दरम्यान ३ सामन्यांची टी२० मालिका होईल. तर १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे होणार असून हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. कसोटी मालिका १९ जानेवारीला संपेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
पहिला वनडे – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे -०२ डिसेंबर – कॅनबेरा
पहिला टी२० – ०४ डिसेंबर – कॅनबेरा
दुसरा टी२० – ०६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी२० – ०८ डिसेंबर – सिडनी
पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर – ऍडिलेड
दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ०७ जानेवारी ते ११ जानेवारी – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ जानेवारी ते १९ जानेवारी – ब्रिस्बेन
महत्त्वाच्या बातम्या –
-भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
-मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
-भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा