---Advertisement---

भारीच! केवळ पस्तीस मिनीटांत एक टीम इंडिया टाॅस हारली, तर दुसरी जिंकली

On: मंगळवार, जुलै 20, 2021 3:48 PM
---Advertisement---

सध्या भारताचे २ क्रिकेट संघ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. विशेष म्हणजे मंगळवारी हे दोन्ही संघ मैदानात खेळताना दिसले. श्रीलंका दौऱ्यातील दुसरा वनडे सामना मंगळवारी दुपारी ३ वाजता कोलंबो येथे सुरु झाला. तर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाचा तीन दिवसीय सराव सामन्याला दुपारी ३.३० वाजता डरहॅम येथे सुरुवात झाली.

त्यामुळे या दोन्ही संघांची साधारण अर्ध्यातासाच्या अंतराने नाणेफेक झाली. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने दुपारी २.३० वाजता नाणेफक गमावली. पण इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात मात्र नाणेफेकीचा कौल दुपारी ३ वाजता भारतीय कसोटी संघाच्या बाजूने लागला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सराव सामन्यासाठी रोहितकडे कर्णधारपद
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. भारताच्या ११ जणांच्या संघात नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा सहभाग नाही. तसेच रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्या अनुपस्थितीत केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी मात्र, भारताच्या ११ जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या वनडे मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्याची संधी शिखर धवनच्या भारतीय संघाकडे असेल.

श्रीलंका दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी, तर इंग्लंड दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंची निवड
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या कसोटी संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, केएल राहुल अशा अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे अशा अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात ऋतुराज गायकवाड, चेतन साकारिया, देवदत्त पडीक्कल, नितीश राणा, वरुण चक्रवर्ती, कृष्णप्पा गॉथम अशा खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय कसोटी संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी भारताचे डरहॅम येथे सराव शिबिर सुरु आहे.

म्हणून करण्यात आले २ संघ 
सध्या कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता, सातत्याने प्रवास करुन आणि क्वारंटाईनचे नियम पाळताना अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने भारताने इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर दोन वेगवेगळे संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारताचा ११ जणांचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताचा ११ जणांचा संघ –
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव

महत्त्वाच्या बातम्या – 

वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार

तुटक्या बोटासह हरमनप्रीतची विश्वचषक सेमीफायनलमध्ये नाबाद १७१ धावांची झुंज, कांगारूंचे तोडले होते कंबरडे

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! आज भारताचे २ वेगवेगळे संघ उतरणार मैदानात; जाणून घ्या सामन्यांविषयी सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---