रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयकडून 15 सदस्यीय संघाची घोषणा केली गेली आहे. मात्र, आता त्या संघातील आणखी एक सदस्य दुखापतग्रस्त झाला आहे.
https://www.instagram.com/reel/CrtFlNqOoL2/?igshid=YmMyMTA2M2Y=
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना (World Test Championship Final 2023) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल येथे पार पडणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील हा सामना 7 जून ते 11 जून यादरम्यान पार पडणार आहे.
या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या डावखुरा अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत याला आयपीएलमध्ये सराव करताना दुखापत झाली. जयदेव आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्याआधी सराव करताना तो घसरला व खांद्यावर पडला. हा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला असून त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उनाडकतने काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र, आता तो दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. कारण, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व श्रेयस अय्यर हे या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. तसेच, संघात निवड झालेले केएल राहुल व उमेश यादव हेदेखील छोट्या छोट्या दुखापतींशी सामना करत आहेत.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेला भारताचा 15 सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
(Team India Pacer Jaydev Unadkat Injured In IPL Doubtful For WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: युवा नवीनने घेतला विराटशी पंगा, शाब्दिक चकमकीनंतर झटकला हात
सामना संपल्यानंतर विराट आणि गंभीरमध्ये राडा! आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा भिडले दिग्गज