---Advertisement---

भारतासह ‘हे’ ८ संघ टी२० विश्वचषक २०२२साठी झाले थेट क्वालिफाय; विंडीज, श्रीलंकेवर मात्र वाईट वेळ

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 3:39 PM
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. तसेच ही स्पर्धा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेपूर्वी वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत रँकिंगच्या जोरावर ८ संघ थेट सुपर-१२ मध्ये प्रवेश करत असतात. तर उर्वरित संघ पात्रता फेरीतील सामने जिंकून सुपर-१२ फेरीत प्रवेश करत असतात. अशातच २०२२ मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया संघासह भारत, अफगानिस्तानसारख्या ८ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. तर २ वेळेस स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला या स्पर्धेत पात्रता फेरीतील सामने जिंकून प्रवेश करावा लागणार आहे.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्यांच्या रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. हे दोन्ही संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यांमध्ये खेळताना दिसून येतील. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगानिस्तान आणि बांगलादेश या संघांनी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत प्रवेश केला आहे.

तसेच आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघांसह आयसीसी रँकिंगमधील ६ सर्वश्रेष्ठ संघांना सुपर-१२ फेरीत प्रवेश दिला जातो. तर इतर संघांना पात्रता फेरीतील सामने जिंकून प्रवेश मिळत असतो.

महत्त्वाच्या बातम्या-

नादचं केलाय थेट! मराठमोळ्या ऋतुराजची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’, महाराष्ट्राचा ओडिसावर २७ धावांनी विजय

संपूर्ण स्पर्धा गाजवून नॉकआऊट सामन्यात न्यूझीलंड ठरलाय फेल, विराटसेनेचं सेमीफायनल गाठणं निश्चित!

न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास काय? घ्या जाणून गणिते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---