जगभरात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी क्रिकेटचे सामने रद्द केले आहेत. असे असले तरी, न्यूझीलंड क्रिकेटने मात्र त्यांचा अ संघाचा ऑगस्ट महिन्यातील भारत दौऱ्याचा पर्याय खुला ठेवला आहे. यावर एवढ्या लवकर निर्णय घेणे आता चुकीचे ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
शिवाय न्यूझीलंड क्रिकेटने असेदेखील म्हटले की, न्यूझीलंड संघाचा (New Zealand) जून आणि जुलैमधील नेदरलँड, स्कॉटलँड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज दौरा होण्याची शक्यता कमी आहे. पण, याबाबतीतही आता पूर्णपणे नकार देता येत नाही. तसेच, न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट (David White) यांनी या महिन्याच्या शेवटी सुरु होणारा न्यूझीलंड महिला संघाचा श्रीलंका दौरा स्थगित करण्यात आला आहे, असेही सांगितले.
यावेळी डेव्हिड म्हणाले की, “क्रिकेटशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी ही खूप निराशादायी गोष्ट आहे. पण, जगभरात कोविड-१९ (Covid- 19) मुळे जी भयावह स्थिती उद्भवली आहे. ती पाहता आपण केवळ आपल्या लोकांचा विचार न करता जगभरातील सर्व नागरिकांचा विचार करायची गरज आहे.”
याबरोबरच डेव्हिड यांनी ऑगस्ट महिन्यातील न्यूझीलंडचा बांगलादेश दौराही (New Zealand Tour of Bangladesh) रद्द होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी डेव्हिड म्हणाले की, न्यूझीलंड याबाबतीत भाग्यशाली राहिला की कोरोना व्हायरसचे संकट उद्भवेपर्यंत आमचे देशांतर्गत उन्हाळी सत्र जवळजवळ संपले होते. पण आता सगळीकडे लॉकडाऊन (Lockdown) चालू असल्यामुळे आम्ही आमच्या संघाच्या समस्यांना समझू शकतो.
न्यूझीलंड क्रिकेट पुढील १२ आठवड्यांपर्यंत शासकीय वेतन अनुदान योजना राबवित आहे. याविषयी बोलताना डेविड म्हणाले की, ही योजना कोविड-१९मुळे प्रभावित नियुक्तांच्या मदतीसाठी आहे. जेणेकरून ते आपापल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकतील.
ट्रेंडिंग घडामोडी-
-१०० कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करणारे ५ खेळाड
-कसोटीत सलामीवीर म्हणून सचिनला मिळाला एकच सामना, त्या सामन्याबद्दल थोडक्यात
-व्यक्ती विशेष- ग्लूसेस्टरचा शेतकरी अॅलेस्टर कूक