ऍशेस 2023च्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ धावा करण्यासाठी झगडताना दिसला. मात्र, संघ अडचणीत असताना मिचेल मार्श याने तडाखेंबद शतक ठोकले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन गेला. मागच्या जवळपास चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन कऱणाऱ्या मार्शने या सामन्यात शतक ठोकले, पण या शतकानंतर मार्शचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत मार्श ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून त्याचा अपेक्षित प्रेम मिळत नाही, असे बोलून दाखवत आहे.
ऑशेस 2023 (Ashes 2023) चा हा तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियायने अनुक्रमे दोन विकेट्स आणि 43 धावांनी विजय मिळवले. तिसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंड संघालने जोरदार सुरुवात केली. पहिल्याच दिवशी इंग्लिश गोलंदाजी आक्रमण ऑस्ट्रेलियावर भारी पडल्याचे दिसले. मार्क वुड (Mark Wood) याने पहिल्या डावात इंग्लंडसाठी पाच विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलिया मर्यादित धावसंख्येवर रोखले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचनेही तीन विकेट्स गमावल्या आणि 68 धावा केल्या.
हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात मिचेल मार्श (Machile Marsh) जरी ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरला. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मार्श ऑस्ट्रेलिय चाहत्यांकडून समर्थन मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत आहे. व्हिडिओत तो म्हणतो की, “होय, बहुतांश ऑस्ट्रेलियन माझा तिरस्कार करतात. ते भावूक असतात. त्यांचे क्रिकेटवर प्रेम आहे. तांना चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असते. यात शंका नाही की, कसोटी क्रिकेटमध्ये मला खूप संधी मिळाल्या. पण मलाच त्या संधी साधता आल्या नाहीत. पण आशा आहे की, चाहते माझा सन्मान करतील.”
मार्शचा हा व्हिडिओ काही वर्ष आधीचा आहे, जो हेडिंग्ले कसोटीनंतर सोशल मीडियावर व्हायरल सर्वत्र फिरत आहे. व्हिडिओत मार्श पुढे म्हणातो की, “पण सत्य हेच आहे की, मी पुनरागमन करेल. मला ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळायला आवडते. बॅगी ग्रीन कॅप घालायला मला आवडते आणि त्यासाठी प्रयत्न करत आहे. एक दिवस मी त्यांना (ऑस्ट्रेलियन चाहत्यांची मने) जिंकेल.” व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे मार्शने हेडिंग्ले कसोटीसाठी संघात पुन्हा स्थान बनवले आणि शानदार शतक ठोकले.
Chuffed for Mitchell Marsh.
Remember this from the 2019 Ashes when @beastieboy07 asked him about how he's viewed back in Australia: "Yeah, most of Australia hate me." Probably not anymore, Mitch #T20WorldCup pic.twitter.com/REJJlI7PUL
— Vithushan Ehantharajah (@Vitu_E) November 14, 2021
ऑस्ट्रेलियन संघाचे सर्व महत्वाचे खेळाडू स्वस्तात बाद होत असताना मिचेल मार्श संघासाठी मोठी खेळी करू शकला. मार्शने आपला शेवटचा सामना सप्टेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर मागच्या चार वर्षांमध्ये मार्श एकही कसोटी खेळला नव्हता. पण गुरुवारी त्याने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने 118 चेंडूत 118 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. (The video of Mitchell Marsh expressing his displeasure after his century in the Headingley Test went viral)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: पीएसएल संघमालकाची आत्महत्या, लग्नाआधीच ‘या’ कारणाने दिला जीव
‘आता तू नाहीये म्हणून मीच…’, धोनीच्या वाढदिवशी पंतने उचलले ‘हे’ पाऊल, पाहा कसे केले सेलिब्रेशन