fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएलमध्ये २.४ करोडो रूपये कमावणाऱ्या ‘या’ खेळाडूचं लग्न झालं मात्र निव्वळ ७.५ रुपयांत

The Wedding cost of this Rajasthan Royals Player Was 7.5 Rupees

-स्वप्निल प्रधान

सहसा एखादी नामांकित व्यक्ती जेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या मोठ्या निर्णयाचा म्हणजे उदाहरणार्थ लग्नाचा विचार करते, तेव्हा विशेषत: खर्चाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करत नाही. चिक्कार पैसा खर्च झाला तरी चालेल पण लग्न अविस्मरणीयच झालं पाहिजे, अशीच बहुतेकदा इच्छा असते. अशा बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने किती शाही पद्धतीने आपला लग्न सोहळा आयोजित केला हे आपण पाहिलंच आहे. मात्र याच विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात खेळणाऱ्या एका खेळाडूने स्वत: चे लग्न केवळ ७.५ रुपयांमध्ये केले आहे.

चला तर मग जाणून घेऊया त्या खेळाडूबद्दल…

भारतीय संघाच्या या खेळाडूने केलं चक्क ७.५ रुपयांत लग्न

तो खेळाडू इतर कोणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज वरुण ऍरॉन आहे. झारखंडचा जलदगती गोलंदाज ऍरॉनने  (Varun Aaron) केवळ ७.५ रुपयांत लग्न करून रागिणी सिंगला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलंय.

ऍरॉनने केवळ ७.५ रुपयांत केलं न्यायालयीन पद्धतीने लग्न

आजच्या या झगमगाटी दुनियेत जिथे लग्न समारंभावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात तिथे वरुण ऍरॉनने न्यायालयीन पद्धतीने (कोर्ट मॅरिज) लग्न केलंय. या न्यायालयीन प्रक्रियेत रागिणीला आपल्या आयुष्याची जोडीदार बनविण्यासाठी त्याला फक्त ७.५ रुपये खर्च करावे लागले.

विनंती अर्जासाठी २.५ रुपये आणि न्यायालयीन शुल्क म्हणून ५ रुपये असे मिळून फक्त ७.५ रुपयात दोघांनी लग्न केलं.

न्यायालयीन पद्धतीने लग्न केल्यानंतर वरुण ऍरॉनने साक्षीदार म्हणून बोलावण्यात आलेले आप्तेष्ट आणि आपल्या कुटुंबातील सदस्य यांच्या उपस्थितीत वरमाळा घालून लग्नाचा विधी पूर्ण केला. यानंतर काही दिवसातच ऍरॉन ख्रिश्चन धमीर्य असल्याने धार्मिक विधींनुसारदेखील त्याने लग्न केले. यावेळी तेजस्वी यादव, मुरली विजय यांसारखे प्रसिद्ध खेळाडू देखील उपस्थित होते.

अशी आहे वरुण आणि रागिणीची प्रेमकहाणी

ऍरॉनने आपली बालमैत्रीण रागिणीशी (Ragini Singh) तो विवाहबंधनात अडकला. रागिणीशी वरुणची पहिली भेट ही त्याच्या वयाच्या ९ व्या वर्षी झाली. त्यावेळी झारखंडमधील जमशेदपूर येथे राहणाऱ्या वरुणच्या आजीकडे शिकण्यासाठी येणाऱ्या रागिणीशी त्याची ओळख झाली. नंतर रोजच्या भेटीगाठीतून आकर्षण वाढत गेले आणि कालांतराने बारावीत असताना दोघांच्याही नकळत या आकर्षणाचे प्रेमात रूपांतर झाले. प्रेमाचा प्रवास पुढे सरकत असतानाच रागिणी शिक्षणासाठी मुंबईत गेली आणि वरुण क्रिकेट खेळण्यात गुंतला गेला. पण यातही वेळ मिळेल, तेव्हा दोघांनी एकमेकांना भेटायची संधी सोडली नाही.

ऍरॉनने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ४७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१. ७८ च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

वरुण ऍरॉनला राजस्थान रॉयल्स या संघाने २०१९ साली तब्बल २.४० कोटी रुपये देऊन आपल्या संघात होते.

वाचनीय लेख-

-एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारे ५ क्रिकेटर, दोन नावं आहेत भारतीय

-आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे ‘पाच’ टी२० ओपनर

-गोलंदाजीत अतिशय हटके विक्रम करणारे ४ भारतीय, कहर म्हणजे विराटही आहे यात सामील

You might also like