ICC CWC 2023 : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आज हार्दिकचा 30वा वाढदिवस असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या माध्यमांतून शुभेच्छा मिळत आहेत. परंतु त्याचा वाढदिवस तेव्हा खास झाला जेव्हा त्याने ४० हजार प्रेक्षकांपुढे आपल्या वाढदिवसाचा केक कापला. हार्दिकसाठी हा क्षण खूप खास होता. या दरम्यान हार्दिक सोबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर मैदानात उपस्थित होता.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधील 9वा सामना आज भारत विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात अरुण जेटली स्टेडीयम, नवी दिल्ली येथे खेळला जात आहे. मैदानात केक कापल्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “संघातील सर्वांना माहीत आहे आज माझा वाढदिवस आहे. मला सकाळी आणि काल रात्री खूप शुभेच्छा मिळाल्या. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करताना आम्ही त्यांच्यावर दबाव टाकला, त्यामुळे आम्हाला फायदा झाला. परंतु आम्ही फलंदाजीला आलो तेव्हा आमच्या ३ विकेट लवकर गेल्या, त्यामुळे आम्ही खूप दबावात होतो. पण विराट (Virat Kohli) आणि केएलने (KL Rahul) ज्याप्रकारे विजय मिळवून दिला त्यामुळे विजयाचे श्रेय त्या दोघांना दिलं पाहीजे.”
बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत विरुद्ध अफगानिस्तान यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर नाणेफेक अफगानिस्तानने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगानिस्तान विश्वचषकातील आपल्या पहिल्या विजयासाठी लढत आहे तर भारत दुसऱ्या. भारतीय संघाने आपल्या पहील्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेटने पराभूत केले होते. भारतीय संघाने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. फलंदाजी करताना सलामी फलंदाजांनी निराश केले परंतु विराट कोहली आणि केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. (Today was an unforgettable day for Hardik Pandya in front of 40 thousand spectators)
महत्वाच्या बातम्या –
क्रेझ INDvPAK सामन्याची! मुंबईकरांसाठी रेल्वेने केली ‘वंदे भारत’ एक्सप्रेसची सोय, पाहा टाइमटेबल
बाऊंड्री लाईनवर ‘लॉर्ड शार्दुल’ची धमाल! कठीण कॅचही बनवला एकदम सोपा, तुम्ही पाहिला का?