टोकियोमध्ये सध्या ऑलिंपिक २०२० स्पर्धेचा थरार रंगला आहे. विविध स्पर्धेत खेळाडू अफलातून कामगिरी करत लक्ष वेधून घेत आहेत. असे असले तरी सोमवारचा दिवस (२६ जुलै) भारतासाठी खास ठरलेला नाही. अनेक स्टार खेळाडूंना सोमवारी पराभवाचा धक्का बसलेला आहे. यात आता जलतरणपटू साजन प्रकाशचाही समावेश झाला आहे. त्याला पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
सोमवारी साजन प्रकाश पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात हिट-२ मध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याने १:५७:२२ सेंकद अशी वेळ नोंदवली. ही वेळ त्याला उपांत्य फेरीत प्रवेशासाठी पुरेशी ठरली नाही. एकूण ३८ जलतरणपटूंमध्ये पहिल्या १६ क्रमांकावर असणाऱ्या जलतरणपटूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. साजन १:५७:२२ सेंकद या वेळेसह २४ व्या क्रमांकावर राहिला.
त्यामुळे पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारातील भारताचे आव्हान संपुष्टात आले. आता साजनकडून पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. तो पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात गुरुवारी स्पर्धेत उतरेल.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Swimming
Men's 200m Butterfly ResultsSajan Prakash finished 4th in his Heat 2 race. At the end of all qualifying Heats, Sajan was placed 24th. Chin up champ @swim_sajan🙌 We'll comeback #StrongerTogether #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/kvlQXki3zc
— Team India (@WeAreTeamIndia) July 26, 2021
भारताच्या अन्य जलतरणपटूंची आव्हाने संपुष्टात
साजन व्यतिरिक्त माना पटेल आणि श्रीहरी नटराज हे दोन भारतीय जलतरणपटू देखील टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होते. मात्र, त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. रविवारी (२५ जुलै) माना पटेल महिलांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात, तर श्रीहरी पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरले.
श्रीहरी हिट-३मध्ये ५ व्या क्रमांकावर राहिला, तर एकूण २७ व्या क्रमांकावर राहिला. तसेच माना पटेल हिट-१ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर एकूण ३९ व्या क्रमांकावर राहिली.
महत्त्वाच्या बातम्या –
आशिष कुमारच्या पराभवासह पुरुष बॉक्सिंगमधील भारताच्या आशांना पूर्णविराम; चीनच्या बॉक्सरने दिली मात
टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?