क्रिकेट खेळात घरच्या मैदानावर खेळाडू कसा खेळला? यापेक्षा जाणकार क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं की तो परदेशात कसा खेळला. चाहते सतत खेळाडूंच्या परदेेशातील कामगिरीवर लक्ष ठेऊन असतात.
खेळाडू जर भारतीय असेल तर आशिया खंडाबाहेरील त्याच्या कामगिरीला विशेष महत्त्व असते. याला कारण असे की भारतीय उपखंडात जे देश खेळतात त्यात बांगलादेश, पाकिस्तान किंवा श्रीलंका येथील खेळपट्ट्या व वातावरण साधारणत: भारतासारखेच असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने चाहत्यांसाठी परदेशातील कामगिरी म्हणजे आशिया खंडातील कामगिरीचं.
भारताकडून आशिया खंडाबाहेर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने (२५३) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर खेळला आहे. तसेच यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके (२९) करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने १८६ सामन्यात २७ शतके केली आहे.
भारताकडून आशिया खंडाबाहेर एकतरी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले २९१ खेळाडू आहेत. यातील केवळ ६० खेळाडूंना एकतरी शतकी खेळी करता आली आहे. भारताकडून आशिया खंडाबाहेर २२४ सामने खेळलेल्या धोनीला यात एकही शतक करता आले नाही हे विशेष. ९५ ही त्याची आशिया खंडाबाहेरील सर्वोत्तम कामगिरी राहिली. Top 5 Indian Batsmen With Most Centuries outside Asia.
भारताकडून आशिया खंडाबाहेर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे खेळाडू
२९- सचिन तेंडूलकर (२५३ सामने)
२७- विराट कोहली (१८६ सामने)
१८- राहुल द्रविड (२२३ सामने)
१८- सौरव गांगुली (१८१ सामने)
१६- रोहित शर्मा (१७० सामने)
भारताकडून आशिया खंडाबाहेर सर्वाधिक वनडे शतके करणारे खेळाडू
१५- विराट कोहली (११४ सामने)
१५- रोहित शर्मा (१०९ सामने)
१२- सौरव गांगुली (१३५ सामने)
११- सचिन तेंडूलकर (१७५ सामने)
०९- शिखर धवन (७८ सामने)
भारताकडून आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी शतके करणारे खेळाडू
१८- सचिन तेंडूलकर (७७ सामने)
१५- सुनिल गावसकर (४६ सामने)
१४- राहुल द्रविड (६८ सामने)
१२- विराट कोहली (४० सामने)
०८- व्हिव्हीएस लक्ष्मण (६१ सामने)
भारताकडून आशिया खंडाबाहेर सर्वाधिक टी२० शतके करणारे खेळाडू
२- केएल राहुल (१८ सामने)
१- सुरेश रैना (३३ सामने)
१- रोहत शर्मा (४७ सामने)
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण